Rohit Sharma | Pat Cummins | WTC Final 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final ला मिळाली रेकॉर्डब्रेक Viewership 'इतक्या' लोकांनी पाहिली भारत वि. ऑस्ट्रेलिया मॅच

WTC Final ने कसोटी क्रिकेटमध्ये व्ह्युवरशीपचा नवा विक्रम नोंदवला आहे.

Pranali Kodre

India vs Australia, WTC Final Viewership: इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ७ ते 11 जून दरम्यान कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. या सामन्याने एक मोठा विक्रम केला आहे.

अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवत कसोटी विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. दरम्यान BARC च्या डेटानुसार हा अंतिम सामना सर्वाधिक पाहिला गेलेला कसोटी सामना ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही कसोटी सामन्याला एवढी व्ह्युवरशिप मिळालेली नव्हती.

BARC डेटानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना 124 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला. ही संख्या 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याच्या व्ह्युवरशिपपेक्षा 32 टक्क्याने अधिक आहे.

तसेच BARC डेटाच्या आधाराने प्रसारक स्टार स्पोर्ट्सने सांगितले की थेट प्रक्षेपणासाठी 14.4 अब्ज मिनिटे वॉच टाईम नोंदवला गेला आहे. दरम्यान, गेल्या काही काळात क्रिकेट सामन्यांच्या व्ह्युवरशिपमध्ये वाढ होताना दिसत आहे.

आगामी आशिया चषक आणि वर्ल्डकपमध्येही मोठी व्ह्युवरशिप मिळण्याची आशा प्रसारकांना आहे. या दोन्ही स्पर्धा हॉटस्टारवर युजर्सला मोफत पाहाता येणार आहेत.

ऑस्ट्रेलियाने जिंकला सामना

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात 63.3 षटकात सर्वबाद 234 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.

तसेच अजिंक्य रहाणेने 46 आणि रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणाला फार काही खास करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तसेच शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरीने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅब्युशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या.

भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT