Virender Sehwag Son: सेहवाग म्हणतोय, 'माझ्या दोन्ही मुलांना बनायचंय ऑलराऊंड, कारण IPL मध्ये...'

विरेंद्र सेहवागने त्याच्या मुलांना ऑलराऊंडर बनायचे असल्याचे सांगत त्यामागील कारणही उघड केले आहे.
Virender Sehwag Sons
Virender Sehwag SonsDainik Gomantak
Published on
Updated on

Virender Sehwag Son: क्रिकेटमध्ये अनेक पिता-पुत्रांच्या जोड्या मैदान गाजवताना दिसल्या आहेत. नुकतेच भारताचा विस्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही म्हटले आहे की त्याच्या मुलांना अष्टपैलू क्रिकेटपटू बनायचे आहे.

सेहवागला दोन मुले असून मोठा मुलगा आर्यवीर १५ वर्षांचा असून वेदांत १२ वर्षांचा आहे. हे दोघेही क्रिकेट खेळतात. तसेच क्रिकेटमध्येच कारकिर्द घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सेहवागही क्रिकेटचे धडे देत असतो. दरम्यान, सेहवागने नुकताच खुलासा केला की त्याच्या मुलांना अष्टपैलू क्रिकेटपटू बनण्याची इच्छा आहे, कारण आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडूंना सर्वाधिक मागणी असते.

सेहवागने अमर उजालाच्या एका कार्यक्रमात सांगितसे की 'मोठा मुलगा आर्यवीर सलामीला फलंदाजी करतो आणि लेग स्पिन गोलंदाजी करतो. तसेच छोटा मुलगा वेदांत ऑफ स्पिन करण्याबरोबरच फलंदाजीही करतो. दोघांनाही अष्टपैलू बनण्याची इच्छा आहे, कारण अष्टपैलू आयपीएलमध्ये सर्वात महागडे ठरतात.'

Virender Sehwag Sons
Virender Sehwag: 'जर विराट कोहलीने माझ्याशी...', सेहवागचा कोचपदासाठी अर्ज केल्याबद्दल मोठा खुलासा

याशिवाय सेहवागने असेही म्हटले की त्याने त्याच्या मुलांना सांगून ठेवले आहे की शिफारस करण्याची वेळ येऊ देऊ नका. तो म्हणाला, 'मी माझ्या मुलांना सांगत असतो की अशी वेळ येऊ नये की वडिलांना शिफारस करावी लागेल. तुम्ही अशी कामगिरी करा की लोकं म्हणतील तुमचा मुलगा चांगले क्रिकेट खेळतो.'

आयपीएल 2023 मधील महागडे 3 खेळाडू

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएल 2023 लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या पहिल्या तीन क्रमांकावर अष्टपैलूच होते. लिलावात पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन होता. त्याच्यासाठी पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांची बोली लावली होती.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन राहिला, त्याला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्स होता, ज्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपये मोजले होते.

Virender Sehwag Sons
Virender Sehwag Offer Help: सेहवागने ओडिशा रेल्वे दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या मुलांसाठी दाखवले औदार्य, करणार 'ही' मदत

विरेंद्र सेहवागची कारकिर्द

सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 104 कसोटी सामने खेळले असून 8586 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 23 शतकाचा आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 251 वनडे सामने खेळताना 15 शतके आणि 38 अर्धशतकांसह 8273 धावा केल्या आहेत.

याशिवाय तो 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला असून 394 धावा केल्या आहेत. त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात मिळून 136 आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने 104 आयपीएल सामनेही खेळले असून 2 शतके आणि 16 अर्धशतकांसह 2728 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com