

Lucknow Encroachment Drive Police Attack: लखनऊ येथील पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धेश्वर परिसरात अवैध अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय पथकावर स्थानिक नागरिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नगरनिगम पथक आणि पोलिसांवर अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
जमावाने प्रशासकीय पथकावर जोरदार दगडफेक केली, ज्यामध्ये काही पोलीस कर्मचारी आणि नगरनिगमचे कर्मचारी जखमी झाले. गंभीर बाब म्हणजे, या गोंधळादरम्यान जमावातील काही लोकांनी एका पोलीस उपनिरीक्षकाचा (PSI) गळा आवळून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तसेच लोखंडी साखळीने पोलिसांवर हल्ला चढवला.
या हिंसक घटनेनंतर पोलिसांनी (Police) अत्यंत कडक भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला. नगरनिगमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 15 जणांविरोधात एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये हत्येचा प्रयत्न, दंगल घडवणे, शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण आणि धमकावणे यांसारख्या अत्यंत गंभीर आणि कडक कलमांचा समावेश करण्यात आला. पोलीस पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत दोन महिलांसह एकूण 6 आरोपींना अटक केली असून, घटनेच्या ठिकाणाहून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी साखळी पुरावा म्हणून जप्त केली.
पोलीस आयुक्त कमलेश दीक्षित यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, शासकीय जमिनी आणि रस्त्यांवरील अवैध डेअरी व इतर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम प्रशासनाकडून राबवली जात आहे. याच दरम्यान पारा भागात पथकावर हल्ला करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कोणत्याही उपद्रवी तत्त्वांची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.