

1 September 2026 Planet Transit Astrology: ग्रह गोचराच्या दृष्टीने 1 सप्टेंबर हा दिवस अत्यंत दुर्मीळ आणि ज्योतिषशास्त्रात अभूतपूर्व मानला जात आहे. द्रिक पंचांगानुसार, या एकाच दिवशी कोणतेही दोन-तीन नव्हे, तर तब्बल 6 महत्त्वाचे ग्रहयोग तयार होत आहेत. यात गुरु आणि शनीचा 'नवपंचम योग', मंगळ-शनीचा 'केंद्र योग', बुध-शनीचा 'षडाष्टक योग', बुध-मंगळचा 'लाभ योग' तसेच बुध-गुरु आणि मंगळ-गुरु यांचा 'द्विदवादश योग' एकापाठोपाठ एक आकार घेणार आहेत.
ज्योतिषाचार्यांच्या मते, गुरु, मंगळ, बुध आणि शनी या चार प्रमुख ग्रहांची ही एकमेकांशी होणारी भागीदारी अत्यंत प्रभावी आणि शुभ फलदायी ठरणार आहे. या महायोगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला, तरी विशेषतः 6 राशींचे नशीब उजळणार असून त्यांना मोठा धनलाभ आणि प्रगती मिळण्याची दाट शक्यता आहे.
मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे भ्रमण तिसऱ्या भावात असल्याने धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामे मार्गी लागून नोकरीत नवी जबाबदारी मिळेल, तसेच अचानक धनलाभाचे योग आहेत. मिथुन राशीसाठी उत्पन्न (Income) आणि करिअर दोन्हीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. कामाचा वेग वाढून नवीन डील किंवा व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कर्क राशीत गुरु अत्यंत मजबूत स्थितीत असल्याने आत्मविश्वास उंचावेल. नोकरीत पदोन्नतीचे संकेत असून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक ताण कमी होईल.
सिंह राशीवर बुधाच्या प्रभावामुळे संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता मजबूत होईल. मार्केटिंग आणि नेटवर्किंग क्षेत्राशी जोडलेल्या व्यापाऱ्यांना जुन्या संपर्कातून चांगला फायदा होईल. तुळ राशीसाठी हा ग्रहयोग करिअरमध्ये उत्तम फळ देणारा ठरेल. प्रलंबित पेमेंट परत मिळण्यासोबतच नोकरीत पगारवाढ किंवा नवीन जबाबदारीची चर्चा होऊ शकते. धनु राशीच्या जातकांसाठी गुरु आणि मंगळाची साथ अफाट प्रगती घेऊन येईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभून रखडलेली कामे पूर्ण होतील आणि दूरच्या शहरातून नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. एकंदरीत, 1 सप्टेंबरचा हा दुर्मिळ योग या 6 राशींच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, यश आणि समृद्धी घेऊन येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.