Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Monsoon Update Goa: राज्यातील घाटलगतच्या भागात दररोज सरासरी ४० ते ४५ मिमी पावसाची नोंद होत असून अपेक्षित पाऊस पडत आहे.
Monsoon Update Goa
Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील घाटलगतच्या भागात दररोज सरासरी ४० ते ४५ मिमी पावसाची नोंद होत असून अपेक्षित पाऊस पडत आहे. त्यामुळे सध्या जी ३१ टक्के पावसाची तुट आहे, ती जुलैमध्ये कमी पडलेल्या पावसामुळे कायम असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यात पुढील चार पाच दिवस अजूनही काही प्रमाणात पाऊस मंदावण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, राज्यात मागील २४ तासांत ८.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात सरासरी ६६.४१ इंच पावसाची नोंद करण्यात आली असून राज्यात ३१.२ टक्के पावसाचा तुटवडा आहे.

Monsoon Update Goa
Goa Film City Project: जागेअभावी फिल्म सिटीचे स्वप्न लांबणीवर; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

पुढील चार दिवस राज्यात मध्यम ते तुरळक पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पणजी शहरात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माही जाणवू लागला आहे.

Monsoon Update Goa
Goa Drug Smuggling: कुरिअर-टपाल सेवांतून ड्रग्सची तस्करी; गोवा पोलिसांची कुरिअर कंपन्यांसोबत जनजागृती मोहीम

काही भागांत ९० इंचांचा टप्पा पूर्ण

राज्यातील काही भागात पाऊस आता ९० इंचाचा टप्पा पूर्ण केला आहे तर काही भागात अजून पाऊस ५० इंचाच टप्पा देखील पूर्ण झालेला नाही. राज्यात सर्वाधिक ९२.९८ इंच इतक्या पावसाची नोंद वाळपईत करण्यात आली आहे तर सर्वात कमी ४२.१६ इंच पावसाची नोंद पणजीत करण्यात आली आहे. यंदा जुलैच्या अखेरीस २४ टक्क्याहून अधिक पावसाचा तुटवडा नोंदविण्यात आला होता जो आतापर्यंतचा जुलैमधील सर्वाधिक पावसाचा तुटवडा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com