Grace Harris Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: ग्रेस हॅरिसची तूफानी खेळी; यूपी वॉरियर्सकडून गुजरात जायंट्सचा 6 विकेट्सनी पराभव

WPL 2024, UP Warriorz vs Gujarat Giants 8th Match: या सामन्यात यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Manish Jadhav

WPL 2024, UP Warriorz vs Gujarat Giants 8th Match: महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) चा आठवा सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्ससमोर 143 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र या सामन्यात यूपी वॉरियर्सने बाजी मारत हंगामातील दुसरा विजय नोंदवला. दरम्यान, ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने सलग दुसरा विजय संपादन केला.

यूपीची दमदार सुरुवात

दुसरीकडे, प्रत्युत्तरात 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार ॲलिसा हिली आणि किरण नवगिरे यांनी यूपी वॉरियर्सला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघींमध्ये 26 चेंडूत 42 धावांची भागीदारी झाली. मात्र, किरण नवगिरेच्या रुपाने यूपीला पहिला धक्का बसला. आठ चेंडूंत 12 धावा करुन ती पॅव्हेलियनमध्ये परतली.

किरण नवगिरेनंतर यूपीची सलामीवीर ॲलिसा हिलीही पॅव्हेलियनमध्ये परतली. तिने 21 चेंडूत 33 धावा केल्या. तिने आपल्या खेळीदरम्यान सात चौकार मारले. चमारी अटापट्टूच्या रुपाने यूपी वॉरियर्सला तिसरा धक्का बसला. ती 17 धावा करुन बाद झाली.

नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तनुजा कंवरने तिने बाद केले. तसेच, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्वेता सेहरावतच्या रुपाने यूपीला चौथा धक्का बसला. 11व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मेघना सिंगने तिला बाद केले. तिला केवळ दोन धावा करता आल्या.

मात्र, ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने सलग दुसरा विजय संपादन केला. या सामन्यात हॅरिसने 33 चेंडूत 60 धावा केल्या तर दीप्तीने 14 चेंडूत 17 धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे यूपीने 26 चेंडू बाकी असताना सहा विकेट्सने सामना जिंकला.

दुसरीकडे, यूपी वॉरियर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला होता. गुजरात जायंट्स अजूनही या मोसमातील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. गुजरात जायंट्सला गेल्या दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

गुजरातने यूपीला 143 धावांचे लक्ष्य दिले होते

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्ससमोर 143 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात गुजरातने चांगली फलंदाजी केली. सलामीला आलेल्या लॉरा आणि बेथ मुनी यांच्यात पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली होती. बेथ मुनी 18 धावा करुन कर्णधार बाद झाली.

त्याचवेळी, लॉराने 4 चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली हरलीन देओल 18 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला राजेश्वरी गायकवाडने अंजली सरवाणीच्या हातून झेलबाद केले. यूपीविरुद्ध चौथ्या विकेटसाठी अॅश्ले गार्डनर आणि फोबी लिचफिल्डमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली.

मात्र, 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक्लेस्टोनने गार्डनरला बाद करुन पॅव्हेलियनमध्ये धाडले. तिने 30 धावा केल्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फोबीही धावबाद झाली. 26 चेंडूत 35 धावा करुन ती पॅव्हेलियनमध्ये परतली. दयालन हेमलता (दोन) आणि कॅथरीन ब्राइस (पाच) या सामन्यात नाबाद राहिल्या. सोफी एक्लेस्टोनने यूपीविरुद्ध तीन विकेट घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाडला एक विकेट मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

SCROLL FOR NEXT