WPL 2024: किरण नवगिरेची आक्रमक खेळी मुंबईवर भारी; यूपी वॉरियर्सने नोंदवला पहिला विजय; MI च्या मुसक्या आवळल्या

WPL 2024 UP Warriorz vs Mumbai Indians: महिला प्रीमियर लीग 2024 चा सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला.
Kiran Navgire
Kiran NavgireDainik Gomantak

WPL 2024 UP Warriorz vs Mumbai Indians: महिला प्रीमियर लीग 2024 चा सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना बुधवारी (28 फेब्रुवारी) बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 6 बाद 161 धावा केल्या होत्या. यूपीला 162 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हा सामना जिंकणे यूपी वॉरियर्ससाठी खूप महत्वाचे मानले जात होते.

वास्तविक, आतापर्यंतचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर यूपी वॉरियर्स इथे पोहोचला होता. तर मुंबई इंडियन्सने पहिले दोन सामने जिंकले होते. दरम्यान, यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकून आपल्या विजयाचे खाते उघडले. दोन सामने गमावल्यानंतर यूपी वॉरियर्सने चांगलाच धडा घेतला. तर मुंबई इंडियन्सचा पहिला पराभव झाला. सलामीवीर अॅलिसा हेली आणि किरण नवगिरे या दोघींच्या आक्रमक खेळीच्या जोरावर यूपीने आपला पहिला विजय नोंदवला.

Kiran Navgire
WPL 2024: चिन्नास्वामीवर स्मृती अन् मेघनाचं वादळ; गुजरात जायंट्सचा 8 विकेट्सने दारुण पराभव

दरम्यान, मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सला विजयासाठी 162 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. मुंबईने 20 षटकात 6 गडी बाद 161 धावा केल्या होत्या. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने अर्धशतकी खेळी खेळली. तिने 47 चेंडूत 55 धावा केल्या.

यास्तिका भाटियाने 26 आणि अमेलिया करने 23 धावा केल्या. कर्णधार नताली सीव्हर ब्रंट 19 धावा करुन बाद झाली, पूजा वस्त्राकर 18 धावा करुन बाद झाली तर अंजली सरवानी 4 धावा करुन बाद झाली. इस्सी वाँगने सहा चेंडूंत नाबाद 15 धावा केल्या. अमनजोत कौर खाते न उघडता नाबाद राहिली. यूपी वॉरियर्सकडून अंजली सरवानी, ग्रेस हॅरिस, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

यूपी वॉरियर्सने शानदार पुनरागमन केले

दरम्यान, पहिले दोन सामने गमावल्यानंतर यूपी वॉरियर्सने या सामन्यात शानदार पुनरागमन केले. सलामीवीर किरण नवगिरेने विस्फोटक शैलीत फलंदाजी केली. तिने अवघ्या 31 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी खेळली, यामध्ये तिने 6 चौकार आणि 4 शानदार षटकार मारले.

विशेष म्हणजे, किरण नवगिरेने कर्णधार ॲलिसा हिलीसोबत 9.1 षटकांत 94 धावांची शानदार पाटर्नशिप केली. कर्णधार ॲलिसा हिलीने 29 चेंडूत 33 धावांची खेळी खेळली. या दोन सलामीवीरांच्या जोरावर यूपी वॉरियर्सने WPL 2024 चा पहिला सामना जिंकला.

याशिवाय, ग्रेस हॅरिसने 38 आणि दीप्ती शर्माने 27 धावांची खेळी खेळली. दीप्तीने चौकार मारुन यूपी वॉरियर्सला या मोसमातील पहिला विजय मिळवून दिला. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजी चांगली झाली, मात्र गोलंदाजांना आपली छाप सोडता आली नाही.

Kiran Navgire
WPL 2024, MI vs GG: कर्णधार हरमनप्रीतचा विजयी षटकार, मुंबईने जिंकला सलग दुसरा सामना; अष्टपैलू एमेलियाही चमकली

दुसरीकडे, गतविजेत्या मुंबईला या मोसमात पहिला पराभव पत्करावा लागला. या विजयासह यूपीचे तीन सामन्यांतून दोन गुण झाले आहेत. गुणतालिकेत यूपीचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला. यूपी वॉरियर्सचा नेट रन रेट -0.357 आहे. दुसरीकडे, मुंबईचे तीन सामन्यांतून चार गुण आहेत. त्याचा नेट रन रेट -0.182 पर्यंत घसरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com