WPL 2024, RCB vs DC: स्मृतीची धडाकेबाज खेळी व्यर्थ, दिल्लीचा शानदार विजय; RCB चा 25 धावांनी पराभव

Women’s Premier League 2024, RCB vs DC: दरम्यान, आरसीबीविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या.
Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak
Published on
Updated on

Women’s Premier League 2024, RCB vs DC: महिला प्रीमियर लीग 2024 चा सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, आरसीबीविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. आरसीबीला 195 धावांचे विशाल लक्ष्य दिले होते.

प्रत्युत्तरात, 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघ 20 षटकात 9 गडी गमावून 169 धावाच करु शकला. स्मृती मानधानाने संघासाठी शानदार खेळी खेळली. मात्र तिची ही खेळी आरसीबीला विजयापर्यंत घेऊन जावू शकली नाही. दिल्ली कॅपिटल्सने मोठा विजय नोंदवला. दिल्लीने आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला.

दरम्यान, दोन्ही संघ आपले मागील सामने जिंकून मैदानात उतरले होते. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गेल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला होता. तर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा 9 गडी राखून पराभव केला होता. दोन्ही संघांनी आपापल्या शेवटच्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला होता.

Smriti Mandhana
WPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचा पराभव अन् स्मृतीच्या RCB ला फायदा; पॉइंट टेबलमध्ये मारली बाजी

दुसरीकडे, 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 169 धावाच करु शकला. स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी झाली. 17 चेंडूत 23 धावा करुन डिव्हाईन बाद झाली. यानंतर कर्णधार स्मृती मानधना 43 चेंडूत 74 धावा करुन बाद झाली.

ऋचा घोषने 13 चेंडूत 19 धावा केल्या. जॉर्जिया 6, मेघना 36, क्लार्क 1 धावा करुन बाद झाली. बंगळुरुच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हा सामना हरल्याने आरसीबीची स्पर्धेतील विजयाची हॅट्ट्रिक हुकली.

Smriti Mandhana
WPL 2024: किरण नवगिरेची आक्रमक खेळी मुंबईवर भारी; यूपी वॉरियर्सने नोंदवला पहिला विजय; MI च्या मुसक्या आवळल्या

दिल्लीने आरसीबीसमोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले होते

दरम्यान, आरसीबीविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामातील ही सर्वोच्च धावसंख्या होती. या सामन्यात फलंदाजी करताना मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती.

मात्र, दोघींमधील 28 धावांची भागीदारी पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संपुष्टात आली. सोफी डिव्हाईनने लॅनिंग पॅव्हेलियनमध्ये धाडले. लॅनिंगने 17 चेंडूत 11 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एलिस कॅप्सीने शफाली वर्मासोबत शानदार भागीदारी केली. दोघींमध्ये 82 धावांची मोठी भागीदारी झाली.

मात्र, 12व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयंका पाटीलने शफाली वर्माला बाद केले. 20 वर्षीय शफालीने आरसीबीविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकले. तिचे हे या स्पर्धेतील हे दुसरे अर्धशतक आहे. तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने तिने 31 चेंडूत अर्धशतक ठोकले.

Smriti Mandhana
WPL 2024: मुंबई-दिल्ली पहिल्या सामन्यात आमने-सामने; जाणून घ्या महत्त्वाचे नियम, संघ अन् कधी व कुठे पाहाणार सामने

त्याचवेळी, ॲलिस कॅप्सीनेही 46 धावांची शानदार खेळी केली. आरसीबीविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला पाचवा धक्का मारिजेन कॅपच्या रुपाने बसला, जी तूफानी फलंदाजी करताना दिसली. 15 चेंडूत 32 धावा करुन ती पॅव्हेलियनमध्ये परतली. ती 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सिमरन बहादूरकरवी सोफी डिव्हाईनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.

याशिवाय, जॅन जोनासनने 16 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी खेळली. आरसीबीकडून सोफी डिव्हाईन आणि नॅडिन डी क्लार्कने दोन-दोन बळी घेतले. त्याचवेळी, श्रेयंका पाटीलनेही विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com