Neeraj Chopra ANI
क्रीडा

World Athletics Championships: गोल्डन बॉय नीरज चोप्रा रोप्य पदकाचा मानकरी

भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) करोडो भारतीयांच्या आशा घेऊन मैदानात उतरला आहे.

दैनिक गोमन्तक

World Athletics Championships: जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेक फायनलला यूजीन, यूएसए येथे सुरुवात झाली आहे. भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) करोडो भारतीयांच्या आशा घेऊन मैदानात उतरला आहे. रोहित यादवही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आणि आज World Athletics Championships स्पर्धेत गोल्डन बॉय नीरज चोप्रा रोप्य पदकाचा मानकरी ठरला आहे.

ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरला. त्याचा पहिला फेक फाऊल घोषित करण्यात आला.

यानंतर चोप्राने दुसऱ्या फेरीत 82.39 मीटर अंतरावर भालाफेक केली.

नीरजचा प्रतिस्पर्धी ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात 90.21 मीटर भालाफेक केली.

त्याचवेळी रोहित यादवने पहिल्या फेरीत 77.96 मीटर आणि दुसऱ्या फेरीत 78.05 मीटर फेक केली.

ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने दुसऱ्या फेरीत 90.46 मीटर अंतरावर भालाफेक करून आपली कामगिरी सुधारली. त्यामुळे नीरजवर दबाव वाढला आहे.

नीरजने तिसऱ्या फेरीत आपली कामगिरी सुधारली आहे. त्याने 86.37 मीटर अंतरावर भालाफेक केली आहे. तो सध्या चौथ्या स्थानावर आहे.

भारताच्या नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकीच्या फायनलमध्ये चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भाला फेक केल्याने आता तो दुसऱ्या स्थानावर आहे.

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत 88.13 मीटरच्या चौथ्या थ्रोसह रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे.

तुम्ही हा सामना सोनी टेन 2 आणि सोनी टेन 2 एचडी वर पाहू शकता. हे सोनी लिव्ह अॅप आणि जिओ टीव्ही अॅपवर देखील प्रसारित केले जाईल. नीरज किंवा रोहितने पदक जिंकल्यास या स्पर्धेच्या इतिहासात असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल. त्याच्या अगोदर अनुभवी अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT