Commonwealth Games 2022 : नीरज चोप्रा करणार अ‍ॅथलेटिक्स संघाचे नेतृत्व

भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अ‍ॅथलेटिक्स संघाची केली घोषणा
Neeraj Chopra News | Commonwealth Games 2022
Neeraj Chopra News | Commonwealth Games 2022Dainik Gomantak

नीरज चोप्राने Olympics 2020 मध्ये झालेल्या स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरले होते. यामूळे भारताचा अनेक वर्षांचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपला. यानंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 ( Commonwealth Games 2022 ) मध्ये नीरजची जबाबदारी वाढणार आहे. कारण या क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा 37 सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे. (Commonwealth Games 2022; Neeraj Chopra will lead the athletics team )

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने (AFI) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी 37 सदस्यीय अ‍ॅथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करणार आहे. 37 सदस्यीय संघात 18 महिला खेळाडू असून या संघात धावपटू हिमा दास आणि दुती चंद यांचाही समावेश आहे. निवडकर्त्यांनी पुरुषांच्या 4x400 मीटर रिले संघाचीही निवड केली आहे.

Neeraj Chopra News | Commonwealth Games 2022
यशस्वी जैस्वालने 50 चेंडूंनंतर खाते उघडताच, पृथ्वी शॉ ने शेअर मजेदार मिम्स

अलीकडेच 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडणारा अविनाश साबळे आणि ज्योती याराजी यांनाही संघात स्थान मिळाले. तर राष्ट्रीय विक्रम धारक अमलान बोरगोहेनला संघाबाहेर ठेवण्यात आले. कारण तो AFI ने निर्धारित केलेला राष्ट्रकुल क्रीडा पात्रता गुण गाठण्यात अपयशी ठरला. राष्ट्रीय विक्रमी तेजस्वी शंकरलाही उंच उडीत संघात स्थान मिळालेले नाही.

Neeraj Chopra News | Commonwealth Games 2022
पाकिस्तानच्या संघात स्थान मिळवणे इतके सोपे आहे? आफ्रिदीचा क्रिकेट बोर्डाला सवाल

भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने घोषित केलेला कॉमनवेल्थ गेम्स 2022 अ‍ॅथलेटिक्स संघ

पुरुष: अविनाश साबळे (3000 मीटर स्टीपलचेस), नितेंदर रावत (मॅरेथॉन), एम श्रीशंकर आणि मोहम्मद अनास याहिया (लांब उडी), अब्दुल्ला अबुबकर, प्रवीण चित्रवेल आणि अल्डोस पॉल (तिहेरी उडी), तेजिंदरपाल सिंग तूर (शॉट पुट), नीरज चोप्रा, डीपी मनू आणि रोहित यादव (भालाफेक), संदीप कुमार आणि अमित खत्री (चालणे), अमोज जेकब, नोहा निर्मल टॉम, राजीव अरोकिया, मोहम्मद अजमल, नागनाथन पांडी आणि राजेश रमेश (4X 400 मीटर रिले)

महिला: एस धनलक्ष्मी (100 मी आणि 4X 100 मीटर रिले), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा), ऐश्वर्या बी (लांब उडी आणि तिहेरी उडी) आणि ए. सोजन (लांब उडी), मनप्रीत कौर (शॉट पुट), नवजित कौर ढिल्लोन आणि सीमा अंतिल पुनिया (चकती फेक), अन्नू राणी आणि शिल्पा राणी (भालाफेक), मंजू बाला सिंग आणि सरिता रोमित सिंग (हातोडा फेक), भावना जाट आणि प्रियांका गोस्वामी (चालणे), हिमा दास, दुती चंद, श्रावणी नंदा, एमव्ही जिलाना आणि एनएस सिमी (4X 100 मीटर रिले).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com