Jemimah Rodrigues | Richa Ghosh Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup: भारताची पाकिस्तानवर मात! जेमिमाह-ऋचा विजयाच्या हिरो

महिला टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानला पराभूत करत विजयी सुरुवात केली आहे.

Pranali Kodre

India Women vs Pakistan Women: भारतीय महिला संघाने रविवारी महिला टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान महिला संघाविरुद्ध 7 विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने आठव्या महिला टी20 वर्ल्डकपची विजयी सुरुवात केली आहे. जेमिमाह रोड्रिग्ज आणि ऋचा घोष भारतासाठी विजयाच्या नायिका ठरल्या.

या सामन्यात भारतीय महिला संघासमोर पाकिस्तान महिला संघाने 150 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 19 षटकात 3 विकेट्स गमावत 151 धावा करत पूर्ण केला.

भारताकडून जेमिमाहने नाबाद 53 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 8 चौकार मारले. तसेच ऋचा घोषने नाबाद 31 धावांची खेळी करताना 5 चौकार मारले. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण नाबाद 58 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने सहज विजय मिळवला.

भारताकडून यास्तिका भाटिया आणि शफाली वर्माने 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. पण यास्तिका 17 धावा करून सादिया इक्बालच्या गोलंदाजीवर बाद झाली.

त्यानंतर काहीवेळातच नश्रा संधूने 10 व्या षटकात शफालीला 33 धावांवर आणि 14 व्या षटकात कर्णधार हरमनप्रीत कौरला 16 धावांवर बाद केले. पण यानंतर जेमिमाह आणि ऋचाने पाकिस्तानला यश मिळू दिले नाही आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मारुफने चांगली कामगिरी केली. तिने नाबाद 68 धावांची खेळी केली. तसेच तिला 18 वर्षीय आयेशा नसिमने चांगली साथ देताना नाबाद 43 धावा केल्या. या दोघींनी सुरुवातीच्या विकेट्स स्वस्तात गेल्यानंतर नाबाद 81 धावांची भागीदारी केली.

गोलंदाजी करताना भारताकडून दीप्ती शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. तिने दुसऱ्याच षटकात पाकिस्तानच्या झवेरिया खानला 8 धावांवरच बाद केले. त्यानंतर राधा यादवने मुनीबा अलीचा (12) अडथळा दूर केला.

लगेचच पूजा वस्त्राकरने निदा दारला शुन्यावर बाद केले. तर सिद्रा अमिनला 11 धावांवर राधा यादवने बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का 13 व्या षटकात दिला होता. मात्र त्यानंतर मारुफने जबाबदारी खांद्यावर घेत आयेशासह अर्धशतकी भागीदारी करत पाकिस्तानला 20 षटकात 4 बाद 149 धावांपर्यंत पोहचवले.

भारताकडून राधा यादवने 2 विकेट्स घेतल्या. तसेच दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT