VIDEO: भर मैदानात राडा! वॉशिंग्टन सुंदर अन् डेव्हिड मिलर भिडले, चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडल्यानं उफाळला वाद; व्हिडिओ व्हायरल

David Miller vs Washington Sundar Fight Video: सामन्यादरम्यान भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि डेव्हिड मिलर यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, ज्यामध्ये पंचांना मध्यस्थी करावी लागली.
David Miller vs Washington Sundar Fight Video
David Miller vs Washington Sundar FightDainik Gomantak
Published on
Updated on

David Miller vs Washington Sundar Fight Video: टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनपेक्षित आणि मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या मैदानावर रंगलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी धुव्वा उडवत स्पर्धेतील टीम इंडियाचा पहिला पराभव नोंदवला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर. मात्र, हा सामना केवळ मिलरच्या फटकेबाजीसाठीच नाही, तर मैदानावरील एका वादासाठीही चर्चेत राहिला. सामन्यादरम्यान भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि डेव्हिड मिलर यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, ज्यामध्ये पंचांना मध्यस्थी करावी लागली.

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना हा वाद उफाळून आला. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता आणि ट्रिस्टन स्टब्सने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळून एक धाव घेतली. याच दरम्यान, सुंदरने अंपायर क्रिस गॅफ्नी यांच्याकडे डेव्हिड मिलरबद्दल तक्रार केली. सुंदरचे म्हणणे होते की, चेंडू टाकण्यापूर्वीच मिलर क्रीजच्या बाहेर निघत होता.

David Miller vs Washington Sundar Fight Video
IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

आपली ही तक्रार मिलरला अजिबात आवडली नाही आणि त्याचा राग अनावर झाला. मिलर रागात सुंदरच्या दिशेने चालून गेला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. हा ड्रामा पाहून अंपायर आणि इतर खेळाडूंना धावून यावे लागले. दोघांमधील वादाचे नेमके शब्द जरी स्पष्ट झाले नसले, तरी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून क्रिकेट वर्तुळात याची मोठी चर्चा सुरु आहे.

मैदानावरील या वादाचा मिलरच्या फलंदाजीवर मात्र कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, कारण अवघ्या 20 धावांत त्यांचे 3 फलंदाज तंबूत परतले होते. अशा कठीण प्रसंगी मिलरने डेवाल्ड ब्रेविससोबत महत्त्वाची भागीदारी रचली. मिलरने केवळ 35 चेंडूंत 7 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 63 धावांची झंझावाती खेळी खेळली.

David Miller vs Washington Sundar Fight Video
IND vs SA: अश्विनला कोण धोबीपछाड देणार? बुमराह आणि अर्शदीपमध्ये 'नंबर 1' साठी काँटे की टक्कर; द. आफ्रिकेविरुद्ध करणार धमाका

मिलरच्या या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने (South Afirca) 187 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 111 धावांत गारद झाला आणि आफ्रिकेने 76 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मिलरला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात असून आता सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी टीम इंडियाला पुढील सामन्यांत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com