

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चेंट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. निमित्त आहे त्यांच्या एका जवळच्या मित्राच्या लग्नाचे. 'यश आणि अहाना' या जोडीच्या लग्नात अनंत आणि राधिकाने चक्क एका सामान्य वऱ्हाड्यासारखा डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लग्नाचे व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
या लग्नाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मिका सिंग. मिका सिंगने या लग्नात लाइव्ह परफॉर्मन्स दिला. विशेष म्हणजे, मिका सिंगने केवळ ३० मिनिटांच्या गाण्यांसाठी तब्बल ३.५ कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या धडाकेबाज गाण्यांवर राधिका मर्चेंटने झूमून डान्स केला, तर अनंत अंबानीनेही आपल्या मित्राच्या लग्नाचा मनसोक्त आनंद लुटला. या डान्स दरम्यान दोघांमधील केमिस्ट्री आणि त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनंत आणि राधिका पारंपारिक वेशभूषेत अत्यंत सुंदर दिसत आहेत. मात्र, कोणत्याही प्रकारचा 'व्हीआयपी' थाट न दाखवता, ते आपल्या मित्रांच्या घोळक्यात मिसळून नाचताना दिसले. विरल भियानी आणि अंबानींच्या फॅन पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "दोघांमध्ये किती छान ताळमेळ आहे", "कोणतीही शोबाजी नाही, किती साधे आहेत दोघे" अशा कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांकडून केला जात आहे.
अनंत आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. २०१८ मध्ये त्यांच्या नात्याची पहिली चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अनेक वर्षांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. जामनगरमधील प्री-वेडिंगपासून ते इटलीतील क्रूझ पार्टीपर्यंत, त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक सोहळ्याने जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली होती. आता लग्नानंतरही हा जोडीचा आनंद आणि उत्साह कमी झालेला नाही, हेच या नवीन व्हिडिओतून दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.