Pakistan Air Strike: पाक-अफगाणिस्तान संघर्षात भारताची 'एन्ट्री'! अफगाण जनतेच्या सुरक्षेसाठी दिला पाठिंबा; 70 दहशतवादी मारल्याचा पाकड्यांचा दावा

Pakistan Afghanistan Clash: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमाभागात रविवारी (22 फेब्रुवारी) पहाटे झालेल्या लष्करी कारवाईमुळे दक्षिण आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे.
Pakistan Afghanistan Clash
Pakistan Air StrikeDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Air Strike Afghanistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमाभागात रविवारी (22 फेब्रुवारी) पहाटे झालेल्या लष्करी कारवाईमुळे दक्षिण आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला की, अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या भागात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये त्यांनी 70 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले.

अफगाणिस्तानच्या मते, या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्यांचा बळी गेला असून मानवतावादी प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचवेळी, भारताने या हल्ल्याची अत्यंत कडक शब्दांत निंदा केली. एवढचं नाहीतर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे समर्थन देखील केले. बलुचिस्ताननेही अफगाण नागरिकांना आपले 'भाऊ' म्हणत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Pakistan Afghanistan Clash
Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली. भारताच्या मते, अफगाणिस्तानवर करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे पाकिस्तानचे स्वतःचे अंतर्गत अपयश लपवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, "रमझानसारख्या पवित्र महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये निष्पाप महिला आणि बालकांचा मृत्यू झाला, ज्याचा भारत तीव्र निषेध करतो.

पाकिस्तान (Pakistan) आपल्या देशांतर्गत असलेल्या त्रुटी आणि समस्यांवरुन जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारच्या हिंसक कारवाया करत आहे. भारत अफगाणिस्तानच्या अखंडतेचा, स्वातंत्र्याचा आणि तिथल्या लोकांच्या हक्कांचा आदर करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे." भारताच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा एकाकी पडताना दिसत आहे.

Pakistan Afghanistan Clash
Pakistan Afghanistan War: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; 'टीटीपी'चे 7 तळ उद्ध्वस्त, 19 जणांचा मृत्यू Watch Video

दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला आपल्या सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन म्हटले. अफगाणिस्तानच्या नंगरहार आणि पक्तिका प्रांतात पाकिस्ताने नागरी वस्त्यांवर बॉम्बहल्ला केला, ज्यात एक मदरसा आणि अनेक घरांचे नुकसान झाले. अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी समाजमाध्यमांवर माहिती देताना स्पष्ट केले की, 70 जणांना मारल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा आहे, उलट या हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे.

नंगरहार प्रांतात रेड क्रेसेंट सोसायटीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 18 मृतदेह सापडले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या या कृतीला अघोषित युद्ध मानले असून यामुळे दोन देशांमधील संबंध अधिकच बिघडले आहेत.

Pakistan Afghanistan Clash
58 सैनिकांचा खात्मा, 25 चौक्यांवर कब्जा, तालिबानच्या चकमकीत पाकिस्तानचं मोठं नुकसान; शाहबाज शरीफ यांची 'जशास तसे' उत्तर देण्याची तयारी VIDEO

या सर्व घडामोडींमध्ये बलुचिस्तानने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. बलुचिस्तानने एका निवेदनाद्वारे अफगाण नागरिकांना आपले बंधू-भगिनी मानून त्यांना समर्थन दिले आहे. बलुचिस्तानने अफगाण जनतेला सावध करताना म्हटले की, पाकिस्तान आपल्या एजंट्सच्या माध्यमातून अफगाण समाजात फूट पाडण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

Pakistan Afghanistan Clash
Tawang Clash: तवांग चकमकीनंतर एअरफोर्स इन अ‍ॅक्शन; सीमेवर लढाऊ विमानांची संख्या वाढवली...

पाकिस्तान पुरस्कृत काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती, जे सध्या परदेशात बसून पाकिस्तानच्या हितासाठी काम करत आहेत, ते पश्तो भाषेचा वापर करुन अफगाण समाजात मिसळण्याचा देखावा करतात. मात्र, ते अफगाणी नसून पाकिस्तानी आहेत, हे ओळखून त्यांच्या खोट्या माहितीला बळी पडू नका, असे आवाहन बलुचिस्तानने केले आहे. बलुचिस्तानने अफगाणिस्तानच्या प्रादेशिक स्थिरता आणि परस्पर आदरासाठी आपली कटिबद्धता जाहीर केली आहे. एकूणच, पाकिस्तानच्या या लष्करी कारवाईमुळे सीमाभागात दहशतीचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या धोरणांवर सडकून टीका होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com