Mumbai Indians vs UP Warriorz Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: जिद्दी युपीसमोर आज बलाढ्य मुंबईचे आव्हान! जाणून घ्या Eliminator मॅचबद्दल सर्वकाही

MI vs UPW: आज वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना रंगणार असून या सामन्यातून अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ निश्चित होईल.

Pranali Kodre

WPL 2023, Eliminator: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व 20 सामने संपले आहेत. या साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवून दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम सामन्यात प्रवेशही केला आहे. आता शुक्रवारी म्हणजेच आज या स्पर्धेतील अंतिम सामन्यात जाणारा दुसरा संघ मिळणार आहे.

आज गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मुंबई इंडियन्स आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या युपी वॉरियर्स संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

आज एलिमिनेटरचा थरार

आज मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघातील एलिमिनेटरचा सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना दुरदर्शनवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहाता येणार असून जिओ सिनेमा ऍपवर ऑनलाईन पद्धतीने पाहाता येणार आहे.

बलाढ्य मुंबई इंडियन्स

या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दणक्यात सुरुवात केली होती. मुंबई इंडियन्सने त्यांचे पहिले पाचही सामने जिंकले होते. त्यांनी पहिल्या पाचही सामन्यात जवळपास प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला चीतपट केले होते.

मुंबईच्या यशात कर्णधार हरमनप्रीतबरोबर हेली मॅथ्यूज, नतालिया स्किव्हर, यस्तिका भाटीया, सायका इशाक, एमेलिया केर, इजी वाँग यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यामुळे एलिमिनेटरच्या महत्त्वपूर्ण सामन्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मुंबईने पहिले पाच सामने जिंकल्यानंतर त्यांच्या कामगिरी काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांना नंतर सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. तरी मुंबई अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत विजयी मार्गावर परतले आहेत.

लढवय्या संघ युपी वॉरियर्स

युपी वॉरियर्ससाठी या स्पर्धेतील कामगिरी संमिश्र राहिली. त्यांनी 8 पैकी 4 सामने जिंकले, तर 4 सामने पराभूत झाले. वॉरियर्सने प्रत्येक सामन्यात झुंज देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. पण वॉरियर्स बऱ्यापैकी फलंदाजीत त्यांच्या परदेशी खेळाडूंवर अवलंबून आहे.

एलिसा हेली, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस हे फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर संघ संघर्ष करताना दिसला आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना फलंदाजीतही चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

दरम्यान, गोलंदाजीत मात्र त्यांची कामगिरी समाधानकारक झाली आहे. सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांचा अनुभव महत्त्वाचा ठरला असून वॉरियर्सने युवा पार्शवी चोप्रावरही विश्वास कायम ठेवलेला दिसतो. तिनेही गेल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सलग पाच विजयानंतर मुंबई इंडियन्सला पहिल्या पराभवाचा धक्का वॉरियर्सनेच दिला होता. त्यामुळे वॉरियर्सने चांगला सांघिक खेळ केल्यास ते मुंबईला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश करू शकतात.

असे आहेत दोन्ही संघ -

मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नतालिया स्किव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), एमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इजी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, हेदर ग्रॅहम, धारा गुजर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला

युपी वॉरियर्स: एलिसा हेली (यष्टीरक्षक/कर्णधार), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, पार्श्वी चोप्रा, सोप्पधंडी यशश्री, शबनीम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस हॅरिस देविका वैद्य, लॉरेन बेल, शिवाली शिंदे, लक्ष्मी यादव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT