WPL 2023: मुंबई इंडियन्सचेही सेम पाँइंट्स असताना दिल्ली कॅपिटल्स थेट Final मध्ये कसे?

Pranali Kodre

दिल्ली कॅपिटल्स संघाने वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामात थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

Delhi Capitals | Dainik Gomantak

दिल्लीने डब्लूपीएलमध्ये साखळी फेरीनंतर 8 पैकी 6 सामने जिंकून 12 पाँइंट्स मिळवले.

Delhi Capitals | Dainik Gomantak

महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्सचे देखील साखळी फेरीनंतर 8 पैकी 6 सामन्यातील विजयानंतर 12 पाँइंट्स आहेत.

Mumbai Indians | Dainik Gomantak

त्यामुळे या स्पर्धेत साखळी फेरीनंतर सर्वाधिक पाँइंट्स मिळवणारे हे दोन संघ ठरले.

Delhi Capitals vs Mumbai Indians | Dainik Gomantak

मात्र, दिल्लीचा नेट रनरेट मुंबईपेक्षा अधिक असल्याने गुणतालिकेत दिल्लीने मुंबईला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.

Delhi Capitals | Dainik Gomantak

साखळी फेरीनंतर दिल्लीचा नेट रनरेट +1.856 इतका आहे, तर मुंबईचा नेट रनरेट +1.711 इतका आहे.

WPL 2023 Points Table | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अव्वल क्रमांकावर राहणारा संघ थेट अंतिम सामन्याला पात्र ठरणार आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांना एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे.

Delhi Capitals | Dainik Gomantak

याच नियमामुळे दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

Delhi Capitals | Dainik Gomantak

तसेच मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना आता गुणतालिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा संघ युपी वॉरियर्स विरुद्ध एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे.

Mumbai Indians | Dainik Gomantak

24 मार्चला होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघातील एलिमिनेटरच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ 26 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

Mumbai Indians vs UP Warriorz | Dainik Gomantak
Rohit Sharma | Dainik Gomantak