Saligao Double Murder: साळगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयिताची आता खैर नाही! गोवा पोलिसांनी उचललं मोठं पाऊल; पळवाटा केल्या बंद!

Saligao Double Murder Case: नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात साळगाव येथील एका दुकानात (Music Shop) रक्ताचा थरार पाहायला मिळाला होता.
Goa Police Look Out Notice
Goa Police Look Out NoticeDainik Gomantak
Published on
Updated on

साळगाव: साळगावमध्ये झालेल्या खळबळजनक दुहेरी हत्याकांडातील तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित जगन्नाथ भगत अद्याप फरार असल्याने गोवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आता अधिकृतपणे 'लुकआउट नोटीस' (LOC) जारी केली आहे. या पावलामुळे संशयित आरोपीला देशाच्या सीमा ओलांडून पळून जाणे आता अशक्य होणार आहे. या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ उडवून दिली होती.

नेमकी घटना काय?

नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात साळगाव येथील एका दुकानात (Music Shop) रक्ताचा थरार पाहायला मिळाला होता. 6 नोव्हेंबर रोजी दुकानाचे मालक रिचर्ड डिमेलो आणि त्यांचा कर्मचारी अभिषेक ऊर्फ सोनू गुप्ता यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकाच वेळी दोन व्यक्तींच्या झालेल्या या खुनामुळे साळगाव आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचे सावट पसरले होते. प्राथमिक तपासात या हत्येमागे जगन्नाथ भगत या व्यक्तीचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, मात्र घटनेनंतर तो गायब आहे.

Goa Police Look Out Notice
Goa Police Meeting: 'पोलिसांकडूनच लपविले जातात गुन्हे'! बैठकीत CM सावंतांनी सुनावले खडे बोल; बेफिकीरीबद्दलही केली नाराजी व्यक्त

लुकआउट नोटीस

संशयित जगन्नाथ भगत हा परदेशात किंवा शेजारील देशात पळून जाण्याची शक्यता गृहीत धरुन गोवा पोलिसांनी 'लुकआउट नोटीस' जारी केली. ही नोटीस देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरे आणि जमिनीवरील सीमा सुरक्षा केंद्रांना पाठवण्यात आली. यामुळे जर जगन्नाथने कोणत्याही मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न केला, तर इमिग्रेशन अधिकारी त्याला त्वरित ताब्यात घेतील. या कारवाईमुळे आरोपीच्या पळवाटा आता बंद झाल्या आहेत.

Goa Police Look Out Notice
Goa Police: बदलीच्‍या ठिकाणी रुजू व्‍हा,अन्‍यथा आता वेतन थांबवणार; पोलिस मुख्यालयाचा 'त्या' 68 पोलिसांना इशारा

गोवा पोलिसांकडून तपास सुरु

गोवा पोलीस (Goa Police) सध्या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी विविध तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष तपासत आहेत. जगन्नाथ भगतने हे हत्याकांड का केले, यामागे काही जुना वाद होता की अन्य काही कारण, याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. पोलिसांच्या मते, आरोपी सध्या लपून बसला असून तो सातत्याने आपला ठावठिकाणा बदलत आहे. त्याचवेळी, "आम्ही सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले असून आम्हाला मिळणाऱ्या माहितीनुसार पुढील कारवाई केली जाईल," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान आता गोवा (Goa) पोलिसांसमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com