Unity Mall Goa: युनिटी मॉलच्या कामाला ब्रेक; न्यायालयाकडून 'जैसे थे' स्थितीचे आदेश

Unity Mall Goa Controversy: गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक या मुद्द्यावर प्रशासनाकडे दाद मागत होते.
Court Order
Court OrderDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: युनिटी मॉलच्या बांधकामाविरोधात लढा देणाऱ्या स्थानिक नागरिकांना आज मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देत ८ जानेवारीपर्यंत 'जैसे थे' स्थिती राखण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा त्यांच्या न्यायाच्या लढाईतील विजयाचा पहिला टप्पा मानला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक या मुद्द्यावर प्रशासनाकडे दाद मागत होते. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आलेली बाजू आणि पुराव्यांची दखल घेत न्यायालयाने सद्यस्थितीत सुरू असलेले बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

Court Order
IND vs BAN Series: तणावाच्या सावटात टीम इंडियाचा बांगलादेश दौरा? BCB कडून वेळापत्रक जाहीर; बीसीसीआयच्या भूमिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

हा केवळ कामाला मिळालेला 'स्टे' नसून, लोकशाही मागनि दिलेल्या लढ्याचा विजय असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या यशामुळे परिसरातील नागरिकांची एकजूट अधिक घट्ट झाली आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण बेकायदेशीर रित्या बांधकाम करून होणारा विकास आम्हाला नको आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

युनिटी मॉल बांधकाम सुरू असून ते थांबवावे यासाठी स्थानिकांनी साखळी उपोषण सुरू केले होते, आणि लोकशाही मार्गाने त्यांनी आपला लढा चालूच ठेवला होता. तर दुसरीकडे स्थानिक गोविंद शिरोडकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. लोकशाही मागनि यश मिळाले नसले तरी तूर्त न्यायालयाकडून स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

Court Order
Saligao Double Murder: साळगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयिताची आता खैर नाही! गोवा पोलिसांनी उचललं मोठं पाऊल; पळवाटा केल्या बंद!

4 जानेवारीला होणार सभा

काणकोणापर्यंत सर्व स्तरातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून प्रत्येकजण समर्थन दाखवत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने आम्हाला सहकार्यही करत आहे. त्यामुळे हे आंदोलन आमचे राहिले नसून ते जनआंदोलन बनले असून बेकायदा घटकांविरोधात कठोरपणाने उभे राहिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण असून ४ जानेवारी रोजी होणारी भव्य सभा ही आणखी ताकदीने होणार आहे, असे गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Zuari River
Colombo High Court Sentences 15 Convicts to 220 Years
Porvorim elevated road 600 crore project
Goa land issue
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com