WPL 2023: RCB साठी शेवटही पराभवानेच! मुंबई इंडियन्सने जिंकली अखेरची लीग मॅच

RCB vs MI: मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाचा धक्का दिला आहे.
Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians
Royal Challengers Bangalore vs Mumbai IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: मंगळवारी वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 19 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने 4 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात मुंबईसाठी एमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरली.

हा सामना मुंबई इंडियन्सचा अखेरचा साखळी सामना होता. मुंबईने यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, बेंगलोरचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपलेले असल्याने त्यांचा हा स्पर्धेतीलही अखेरचा सामना होता. पण त्यांच्यासाठी स्पर्धेचा शेवटही पराभवाने झाला आहे. बेंगलोरला या स्पर्धेत त्यांच्या पहिल्या पाचही सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

मंगळवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईसमोर विजयासाठी 126 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने 6 विकेट्स गमावत 16.3 षटकात 129 धावा करत पूर्ण केला.

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians
WPL 2023: नंबर वनसाठी आज रंगणार चूरस! कोणाला आहे पहिला फायनलिस्ट बनण्याची संधी, घ्या जाणून

मुंबईकडून हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटीया यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी करत चांगली सुरुवात केली होती. पण यास्तिकाला 30 धावांवर श्रेयंका पाटीलने बाद करत ही जोडी तोडली. त्यानंतर हेलीही 24 धावांवर बाद झाली.

यानंतर मधल्या षटकात मुंबईने हरमनप्रीत कौर (2) आणि नतालिया स्किव्हर (13) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण नंतर एमेलिया केरने पुजा वस्त्राकरबरोबर 47 धावांची भागीदारी करत मुंबईसाठी विजय सोपा केला. पण पुजा 19 धावा करून बाद झाली. पण एमेलियाने मुंबईला १७ व्या षटकात विजयापर्यंत पोहचवले. एमेलिया 31 धावांवर नाबाद राहिली.

आरसीबीकडून कनिका अहुजाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. मेगन शट, श्रेयंका पाटील, एलिस पेरी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians
MUM vs DEL, WPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने उडवला मुंबई इंडियन्सचा धुव्वा, 9 षटकात केल्या 110 धावा

तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. या निर्णयाचा फायदा घेत मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पहिल्याच षटकात सोफी डिवाईन शुन्यावर धावबाद झाली. त्यानंतर संयमी खेळ करणाऱ्या कर्णधार स्मृती मानधनाचा अडथळा सातव्या षटकात एमेलिया केरने दूर केला. मानधना 25 चेंडूत 24 धावा करून माघारी परतली.

त्यानंतरही आरसीबीच्या फलंदाज नियमित अंतराने बाद झाल्या. मानधनानंतर एलिस पेरी आणि ऋचा घोष यांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. पण या तिघींतिरिक्त अन्य कोणीही 20 धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत.

त्यातच 17 व्या षटकात नतालिया स्किव्हरने पेरी आणि श्रेयंका पाटील यांना बाद करत दुहेरी धक्के आरसीबीला दिले होते. अखेर आरसीबी 20 षटकात 9 बाद 125 धावाच करू शकले. मुंबईकडून एमेलिया केरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच नतालिया स्किव्हर आणि इजी वाँग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर सायका इशाकने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com