Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Viral Video News: सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे दररोज नवनवीन आणि कल्पनेपलीकडील गोष्टी पाहायला मिळतात.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे दररोज नवनवीन आणि कल्पनेपलीकडील गोष्टी पाहायला मिळतात. कधी कौतुक वाटावे असे जुगाड दिसतात, तर कधी अंगावर काटा येईल असे स्टंट. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसावे की संताप व्यक्त करावा हे कळणार नाही. दाट धुक्यामुळे रस्ता दिसत नसल्याने काही तरुणांनी चक्क एका मित्राला कारच्या बोनटवर बसवून 'लाईव्ह नेव्हिगेशन' म्हणून वापरले आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

धोकादायक शक्कल

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कारच्या आतून रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, परिसरात इतके दाट धुके आहे की समोरचे काहीही दिसत नाहीये. याला विज्ञानाच्या भाषेत 'झिरो व्हिजिबिलिटी' म्हणतात.

अशा परिस्थितीत गाडी चालवणे अत्यंत कठीण असते. यावर उपाय म्हणून कारमधील तरुणांनी एका मुलाला घराबाहेर कडाक्याच्या थंडीत कारच्या बोनटवर बसवले आहे. तो मुलगा बोनटवर बसून ड्रायव्हरला पुढे जाण्यासाठी दिशा दाखवत आहे. व्हिडिओमध्ये तरुण अभिमानाने सांगत आहेत की, रस्ता दिसत नसल्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला आहे. हे तरुण मुख्य रस्त्यावर नसून 'ऑफ रोड' ड्रायव्हिंग करत असल्याचेही व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे.

Viral Video
Goa Tourism: ..यावेळी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट! व्यावसायिकांचा दावा; खंडित विमानसेवा, आगप्रकरण कारणीभूत असल्याचे प्रतिपादन

सोशल मीडियावर टीकेची झोड

हा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @Kapil_Jyani_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला "हे भारत आहे, इथे रस्त्यावर चालणे लहान मुलांचा खेळ नाही," असे कॅप्शन देण्यात आले आहे.

व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असले तरी, नेटकऱ्यांनी या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले की, "बिचाऱ्या मुलाला थंडीत बाहेर बसवून हे कसले शौर्य गाजवत आहेत?" तर दुसऱ्या एका युजरने गंभीर प्रश्न उपस्थित करत लिहिले की, "लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि रील बनवण्यासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे. बोनटवर बसलेली व्यक्ती खाली पडून गंभीर अपघात होऊ शकला असता."

Viral Video
Goa Tourism: ..यावेळी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट! व्यावसायिकांचा दावा; खंडित विमानसेवा, आगप्रकरण कारणीभूत असल्याचे प्रतिपादन

स्टंटबाजी की रीलचे वेड?

आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र दिसत आहे. धुक्यात रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅप्स किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी अशा प्रकारे मानवी जीवाचा धोका पत्करणे हे केवळ बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. बोनटवर बसलेली व्यक्ती जर निसटली किंवा चालकाने अचानक ब्रेक दाबला, तर मोठा अनर्थ ओढवू शकतो. पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अशा प्रकारचे जीवघेणे 'जुगाड' थांबण्याचे नाव घेत नाहीत, ही चिंतेची बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com