WPL 2023 Timetable Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्समध्ये रंगणार पहिला सामना! पाहा संपूर्ण वेळापत्रक

वूमन्स प्रीमियर लीग 2023 हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे.

Pranali Kodre

WPL 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2023 हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या हंगामाचा लिलावा सोमवारीच मुंबईत पार पडला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वेळापत्रक समोर आले आहे.

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स हे पाच संघ खेळणार आहेत. दरम्यान या हंगामाला 4 मार्चपासून सुरूवात होणार आहे.

डब्ल्यूपीएलमध्ये 23 दिवसात एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील 20 सामने साखळी फेरीत पार पडतील. तर एक एलिमिनेटर आणि अंतिम सामना असे प्लेऑफचे 2 सामने असतील. गे सर्व सामने मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर मिळून पार पडणार आहेत. दोन्ही स्टेडियमवर प्रत्येकी 11 सामने खेळवले जाणार आहेत.

तसेच एकूण 4 डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) पार पडणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तसेच दुसरा सामना 7.30 वाजता सुरू होईल.

या हंगामातील पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात रंगणार आहे. या सामन्याने डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामाची सुरुवात होईल. तसेच साखळी फेरीतील अखेरचा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर 21 मार्च रोजी खेळवला जाईल.

साखळी फेरीनंतर डीवाय पाटील स्टेडियमवर 24 मार्च रोजी एलिमिनेटरचा सामना होईल, तर ब्रेबॉर्न स्टेडियमवर 26 मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

WPL 2023 Timetable

या हंगामासाठी झालेल्या लिलावात एकूण 87 खेळाडूंचा लिलाव लागला आहे. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या 87 खेळाडूंसाठी 5 फ्रँचायझींनी मिळून 59 कोटी 50 लाख रुपये खर्च केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT