WPL Auction 2023: कोट्यवधींच्या खर्चानंतर कसे आहेत पाचही संघ? एका क्लिकवर वाचा संपूर्ण लिस्ट

सोमवारी झालेल्या पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावानंतर पाचही संघ पूर्ण तयार झाले असून कोणत्या खेळाडूला कोणत्या संघात संधी मिळाली घ्या जाणून.
WPL 2023
WPL 2023 Dainik Gomantak

WPL Auction 2023: महिला आयपीएलचा म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामाचा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला. या लिलावानंतर आता पहिल्या डब्ल्यूपीएल हंगामासाठी पाचही संघांनी संघबांधणी पूर्ण केली आहे.

या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स असे पाच संघ सहभागी होणार आहेत. हे पाचही संघ यंदाच्या लिलावात चांगलेच व्यस्त दिसले.

या संघांना या लिलावासाठी प्रत्येकी 12 कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी होती. त्यामुळे या पैशांमध्ये या फ्रँचायझींनी त्यांचा संघ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

WPL 2023
WPL 2023: मुंबई इंडियन्स संघात झुलनसह इंग्लंडच्या दिग्गज क्रिकटरची एन्ट्री, सांभाळणार 'ही' जबाबदारी

दरम्यान, या लिलावासाठी 448 खेळाडूंचा समावेश होता. यातील 87 खेळाडूंना बोली लागली आहे. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंचा. तसेच या 87 खेळाडूंसाठी एकूण 59 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 3 कोटी 40 लाख रुपये खर्च केले. तसेच एकूण 7 खेळाडूंना 2 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची बोली लागली.

या लिलावानंतर असे आहेत पाचही संघ -

दिल्ली कॅपिटल्स -

जेमिमाह रोड्रिग्ज (2.20 कोटी), शफाली वर्मा (2 कोटी), मॅरिझेन केप (1.50 कोटी), मेग लेनिंग (1.10 कोटी),ऍलिस कॅप्सी (75 लाख),शिखा पांडे (60 लाख), जेस जोनासन (50 लाख), लौरा हॅरिस (45 लाख), राधा यादव (40 लाख), अरुंधती रेड्डी (30 लाख), मिनू मनी (30 लाख),पूनम यादव (30 लाख), स्नेहा दिप्ती (30 लाख), तानिया भाटिया (30 लाख), तितास साधू (25 लाख),जसिया अख्तर (20 लाख), अपर्णा मोंडल (10 लाख), तारा नोरीस (10 लाख).

WPL 2023
WPL Teams: महिला IPL टीम जाहीर, आदानींचा ठरला सर्वात महागडा संघ; 4669.99 कोटींचे...!

गुजरात जायंट्स -

ऍश्ले गार्डनर (3.20 कोटी), बेथ मुनी (2 कोटी), जॉर्जिया वेरहॅम (75 लाख), स्नेह राणा (75 लाख), ऍनाबेल सदरलँड (70 लाख), डिएंड्रा डॉटिन (60 लाख), सोफिया डंकली (60 लाख), सुष्मा वर्मा (60 लाख), तनुजा कन्वर (50 लाख), हर्लिन देओल (40 लाख),ऐश्वनी कुमारी (35 लाख),दयालन हेमलथा (30 लाख), मानसी जोशी (30 लाख), मोनिका पटेल (30 लाख), शब्बीनेनी मेघना (30 लाख), हर्ली गाला (10 लाख), परुनिका सिसोदिया (10 लाख), शबनम शकिल (10 लाख)

मुंबई इंडियन्स -

नतालिया स्किव्हर (3.20 कोटी), पुजा वस्त्राकार (1.90 कोटी), हरमनप्रीत कौर (1.80 कोटी), यास्तिका भाटिया (1.50 कोटी),एमेलिया केर (1 कोटी), अमरज्योत कौर (50 लाख), हेली मॅथ्यूज (40 लाख), क्लो ट्रायॉन (30 लाख),हिदर ग्रॅहम (30 लाख), इसाबेल वाँग (30 लाख), प्रियंका बाला (20 लाख), धारा गुज्जर (10 लाख),हुमेरा काझी (10 लाख),जिंतीमनी कालिता (10 लाख), निलम बिश्त (10 लाख),सायका इशक (10 लाख), सोनम यादव (10 लाख).

WPL 2023
WPL 2023 Auction: टीम इंडियाची कॅप्टन झाली मुंबईकर! हरमनप्रीतला लागली 'इतक्या' कोटींची बोली

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर -

स्मृती मानधना (3.40 कोटी), ऋचा घोष (1.90 कोटी), एलिसा पेरी (1.70 कोटी),रेणूका सिंग (1.50 कोटी), सोफी डिवाईन (50 लाख), हिदर नाईट (40 लाख),मेगन शट (40 लाख), कनिका अहुजा (35 लाख), डेन वॅन निकर्क (30 लाख),एरिन बर्न्स (30 लाख), प्रीती बोस (30 लाख),कोमल झंझाड (25 लाख), आशा शोभना (10 लाख), दिशा कासट (10 लाख), इंद्रानी रॉय (10 लाख), पुनम खेमनार (10 लाख),सहाना पवार (10 लाख), श्रेयंका पाटील (10 लाख)

युपी वॉरियर्स -

दीप्ती शर्मा (2.60 कोटी), सोफी एक्लेस्टोन (1.80 कोटी), देविका वैद्य (1.40 कोटी), ताहलिया मॅग्रा (1.40 कोटी), शबनिम इस्माईल (1 कोटी), ग्रेस हॅरिस (75 लाख), एलिसा हेली (70 लाख), अंजली सारवाणी (55 लाख), राजेश्वरी गायकवाड (40 लाख), श्वेता सेहरावत (40 लाख), किरण नवगिरे (30 लाख),लॉरेन बेल (30 लाख), लक्ष्मी यादव (10 लाख),पार्श्वी चोप्रा (10 लाख), एस यशश्री (10 लाख), सिमरन शेख (10 लाख)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com