Wimbledon 2023 Dainnik Gomantak
क्रीडा

Wimbledon 2023: मेडिटेशन रुम्सचा 'त्या' कृत्यासाठी वापर कराल तर खबरदार; विम्बल्डन अधिकाऱ्यांची चाहत्यांना तंबी

Wimbledon News: विम्बल्डन ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा असून, यंदाच्या वर्षीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

Ashutosh Masgaunde

Wimbledon News: विम्बल्डन (विम्बल्डन 2023) ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा असून, पुन्हा एकदा सर्वात मोठी टेनिस स्पर्धा सुरू झाली आहे.

विम्बल्डन स्पर्धा ३ जुलैपासून खेळवली जात आहे. त्याचा अंतिम सामना 16 जुलै रोजी होणार आहे. त्याचवेळी आता विम्बल्डन प्रशासनाने टेनिस चाहत्यांना कडक इशारा दिला आहे.

विम्बल्डनने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टेनिस चाहत्यांनी लैंगिक कृत्यासाठी प्रेअर आणि मेडिटेशन रुम्सचा वापरू नये.

गेल्या वर्षी, कोर्ट 12 जवळील रुम्सचा वापर प्रेमात असलेल्या जोडप्यांनी लैंगिक कृत्यासाठी केला होता, त्यामुळे अनेक प्रक्षकांनी संताप व्यक्त केला होता. आता यावेळी विम्बल्डनने याबाबत कडक इशारा दिला आहे.

आम्ही हे सुनिश्चित करू की, प्रेक्षक प्रअर आणि मेडिटेशन रुम्सचा वापर योग्य प्रकारे करतील. अनेकांना समाने सुरू असताना प्रेअर आणि मेडिटेशन करायचे असते, अशात तेथे कोणी आक्षेपार्ह करत असतील तर ते अमान्य आहे.
सॅली बोल्टन, मुख्य कार्यकारी अधिकारी ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब

2022 च्या विम्बलड स्पर्धेदरम्यान, प्रेक्षकांनी एका जोडप्याला कोर्ट 12 च्या बाजूने जाताना पाहिले होते.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने एका पुरुष आणि महिलेच्या चेहऱ्यावर "मोठे हसू" घेऊन खोली सोडताना पाहिले. ते लोक येथे काय करत आहेत याबद्दल जास्त काही सांगयची गरज नाही. असे तो प्रत्यक्षदर्शी म्हणाला.

विम्बल्डनची ही १३६ वी आवृत्ती लंडनमधील ऑल इंग्लंड क्लबमध्ये खेळवली जात आहे. 2022 मध्ये, पुरुष एकेरीचे विजेतेपद सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने जिंकले होते.

महिला एकेरीचे विजेतेपद कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने नावे केले होते. या दोन्ही खेळाडूंना यंदाही आपले विजेतेपद कायम राखायचे आहे.

भारतात ही स्पर्धा दुपारी ३.३० पासून पाहता येईल, टेनिस चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विम्बल्डनचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा मोबाईलवरील डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवरही पाहता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT