सां जुझे आरियल ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोप; सप्टेंबरनंतर एकही ग्रामसभा घेतली नसल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले

St Jose de Areal Gram Sabha Dispute: सां जुझे द आरियल येथील ग्रामसभा रविवारी आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. फ्रेडी त्रावासो, डेनी व इतर नागरिकांनी सरपंच ज्योयसी डायस खोटे बोलतात व योग्य उत्तरे देत नाहीत, असा आरोप यावेळी केला.
St Jose de Areal Gram Sabha Dispute
St Jose de Areal Gram Sabha DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सां जुझे द आरियल येथील ग्रामसभा रविवारी आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. फ्रेडी त्रावासो, डेनी व इतर नागरिकांनी सरपंच ज्योयसी डायस खोटे बोलतात व योग्य उत्तरे देत नाहीत, असा आरोप यावेळी केला.

सप्टेंबरनंतर ही ग्रामसभा होत आहे. मध्यंतरी एकही ग्रामसभा का घेतली गेली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मागच्या ग्रामसभेचा इतिवृत्तांतही पूर्ण नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरपंच लोकांची दिशाभूल करतात, असा आरोपही त्यांनी केला.

स्थानिकांनी ही ग्रामसभा पुढे ढकलण्याची मागणी केली. पण सरपंचांनी मागच्या इतिवृत्तांत लोकांच्या सूचनांची दखल घेत त्याला मंजुरी दिली, तर पंचायतीचा अर्थसंकल्प पुढील ग्रामसभेत मांडण्याचा निर्णय सरपंचांनी जाहीर केला.

St Jose de Areal Gram Sabha Dispute
Goa Crime: सर्व्हिस रोडवर कंटेनर उभा केला अन्... कोलवाळमध्ये यूपीच्या ट्रक चालकानं गळफास घेत संपवलं जीवन

इतिवृत्तांताला अनुमोदन देण्यास कुणीच तयार नव्हते. त्यांनीच सादर करून व अनुमोदन देत तो मंजूर केला, असे आरोप डेनी यांनी केले.

एप्रिल महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत अर्थसंकल्प मांडला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आपल्यावर काही जणांनी खोटे आरोप केले. त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ग्रामसभेत काही लोकांनी ग्रामसभेसंदर्भात नसलेले विषय उपस्थित केले. त्याला आपण उत्तर द्यायला बांधील नव्हतो, असेही सरपंचांनी स्पष्ट केले.

St Jose de Areal Gram Sabha Dispute
Goa History: 1320 च्या दशकात खिलजी सेनापती मलिक काफूरने गोपकपट्टण लुटले; आर्यादुर्गा व गोव्यातील कदंब

आरोपात काहीही तथ्य नाही : सरपंच

यासंदर्भात सरपंच ज्योयसी डायस यांनी सांगितले की, यापूर्वीच्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी दुसऱ्या सरपंच होत्या. त्यानंतर अनेक कामे प्रलंबित राहिली. ही कामे पूर्ण करण्यास आमचा वेळ गेला. तरीसुद्धा तयारी करून आम्ही आजची ग्रामसभा बोलावली. मागचा इतिवृत्तांत सादर करून लोकांच्या सूचना लक्षात घेऊन व त्यात सुधारणा करून तो मान्य करण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com