Ashes 2023: आधीच पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतूनच बाहेर

Ashes 2023 : तिसऱ्या ऍशेस कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.
England
EnglandDainik Gomantak
Published on
Updated on

Ollie Pope ruled out of Ashes 2023 Series: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस 2023 मालिका सुरू आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालितील तिसरा सामना 6 जुलैपासूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरू होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंडचा सलामीवीर ऑली पोप उर्वरित ऍशेस मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान खांद्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या खांद्याचे स्कॅन करण्यात आले.

या स्कॅनमधून असे समोर आले आहे की त्याची दुखापत गंभीर असून तो आगामी मालिकेला मुकणार आहे. त्याचा खांदा निखळला असून आता त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याच्या दुखापतीवर इंग्लंड आणि सरे संघाची मेडिकल टीम लक्ष ठेवून असेल.

England
Ashes 2023: बेअरस्टोच्या विकेटने गदारोळ! स्टोक्स म्हणाला 'असं जिंकलो नसतो', तर कमिन्सला आठवला 'तो' वादग्रस्त कॅच

दरम्यान इंग्लंडने त्याचा बदली खेळाडू म्हणून अद्याप कोणाचीही घोषणा केलेली नाही. पण आता तिसऱ्या कसोटीत त्याच्या जागेवर डॅन लॉरेन्स प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसू शकतो. असे झाल्यास लॉरेन्स जवळपास वर्षभरानंतर कसोटीत खेळताना दिसेल. तो अखेरचा कसोटी सामना मार्च 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.

दरम्यान, इंग्लंडने तिसऱ्या ऍशेस कसोटीतून रेहान अहमदला वगळण्यात आले आहे. त्याला दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त मोईन अलीच्या जागेवर संधी देण्यात आली होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले नव्हते. आता अली दुखापतीतून लककर बाहेर येईल अशी अपेक्षा इंग्लंडला आहे.

England
Ashes 2023: 'याचसाठी तू आठवणीत राहशील...' बेअरस्टोच्या विकेटवर चिडलेल्या ब्रॉडनं लाईव्ह सामन्यात कॅरेला सुनावलं

ऑस्ट्रेलियाला ऍशेस जिंकण्याची संधी

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही कसोटीत विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या या ऍशेस मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आगामी तिन्ही कसोटीतील एकाही सामन्यात विजय मिळवला, तरी ऑस्ट्रेलिया यंदाच्या ऍशेस मालिकेत विजय निश्चित करेल.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com