Goa Crime: सर्व्हिस रोडवर कंटेनर उभा केला अन्... कोलवाळमध्ये यूपीच्या ट्रक चालकानं गळफास घेत संपवलं जीवन

Pappu Singh Suicide Colvale Goa: कोलवाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर उत्तर प्रदेशातील एका ट्रक चालकाने उभ्या कंटेनर ट्रकच्या साहाय्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कोलवाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर उत्तर प्रदेशातील एका ट्रक चालकाने उभ्या कंटेनर ट्रकच्या साहाय्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. पप्पू सिंग (वय ५९) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलवाळ महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर कंटेनर ट्रक उभा करण्यात आला होता. संबंधित चालकाने ट्रकच्या टपावर चढून शेजारील झाडाच्या फांदीला दोरी बांधून गळफास घेतला.

Goa Crime
Goa Crime: घातपात की अपघात? पणजीच्या ला कॅम्पला कॉलनीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

काही वेळाने ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

म्हापसा अग्निशमन दल यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पंचनामा करण्यात आला. या व्यक्तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com