Zaheer Khan New Bowling Coach: झहीर खान बनणार नवा बॉलिंग कोच? टीम इंडियाच्या गोलंदाजीला मिळणार 'झॅक'ची धार

Zaheer Khan India's new bowling coach: टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि २०११ च्या विश्वचषक विजयाचा नायक झहीर खान पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Zaheer Khan India's new bowling coach
Zaheer Khan India's new bowling coachDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि २०११ च्या विश्वचषक विजयाचा नायक झहीर खान पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये दिसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने आगामी काळातील वेगवान गोलंदाजांची फौज तयार करण्यासाठी झहीर खानकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरू केली आहे.

बेंगळुरूच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये जहीरची एन्ट्री

मिळालेल्या माहितीनुसार, झहीर खान मार्चच्या पहिल्या आठवड्यात बेंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मध्ये एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने ९ फेब्रुवारी रोजी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. ट्रॉय कूली यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. जहीर खानचा दांडगा अनुभव पाहता, बोर्ड त्याला ही जबाबदारी देऊन युवा गोलंदाजांना पैलू पाडण्याचे काम सोपवू इच्छिते.

Zaheer Khan India's new bowling coach
Goa Tourism: गोव्यातील किनारी पर्यटनाचा आंध्र सरकारकडून अभ्यास, तीन दिवस पाहणी; शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

कोचिंगसाठी झहीर खान सज्ज; आयपीएलचा अनुभव कामी येणार

झहीर खान केवळ अनुभवी खेळाडूच नाही, तर त्याला प्रशिक्षणाचाही मोठा अनुभव आहे. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांसारख्या संघांसोबत मार्गदर्शक (मेंटॉर) आणि प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. जहीर स्वतः भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे समजते. त्याच्या येण्याने भारतीय वेगवान गोलंदाजीला नवी धार मिळण्याची शक्यता आहे.

Zaheer Khan India's new bowling coach
Goa Crime: घातपात की अपघात? पणजीच्या ला कॅम्पला कॉलनीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

सध्या दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मॉर्नी मॉर्कल भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. मॉर्कल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात मैत्रीचे घट्ट नाते आहे, परंतु झहीर खानच्या एन्ट्रीमुळे समीकरणे बदलू शकतात. ज्याप्रमाणे राहुल द्रविड यांनी प्रथम एनसीएमध्ये (आताचे CoE) काम करून नंतर मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले होते, त्याच मार्गावरून झहीर खान भारतीय संघाचा मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com