Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant: पुढच्या वर्षीही ऋषभ पंत आयपीएल खेळणार नाही? 'या' दिग्गज वेगवान गोलंदाजाचे मोठे वक्तव्य

Ishat Sharma On Rishab Pant Fitness: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच जखमी खेळाडूंचे मेडिकल रिपोर्ट जारी केले.

Manish Jadhav

Ishat Sharma On Rishab Pant Fitness: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच जखमी खेळाडूंचे मेडिकल रिपोर्ट जारी केले. गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतने पुन्हा एकदा सराव सुरु केल्याची बातमी बोर्डाने दिली होती.

या बातमीने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. त्यांना वाटते की, पंत आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो, परंतु टीम इंडिया (Team India) आणि दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा त्याच्या पुनरागमनाबद्दल फारसा आशावादी नाही.

दरम्यान, पंत पूर्णपणे तंदुरुस्त असेल आणि केवळ विश्वचषकासाठीच नव्हे तर पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठीही उपलब्ध असेल, असे इशांतला वाटत नाही. मात्र, पंतने पुन्हा सराव सुरु केला आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता.

काय म्हणाला इशांत शर्मा?

"मला वाटते की, कदाचित पुढच्या आयपीएल हंगामातही ऋषभ खेळताना दिसणार नाही, कारण ही किरकोळ दुखापत नाही. हा एक अतिशय गंभीर अपघात होता. मात्र आता, त्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षणाला सुरुवात केली आहे. तो उत्तम सराव करत आहे," असे इशांतने भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असताना सांगितले.

इशांत पुढे म्हणाला की, "दिलासादायक बाब म्हणजे त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली नाही. जर त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली असती तर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला असता. त्याच्यावर आता एक शस्त्रक्रिया झाली आहे, पण मला वाटत नाही की तो विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल. आशा आहे की, तो आयपीएलसाठी तंदुरुस्त असेल तर ते खूप चांगले होईल."

पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले

आयपीएल 2023 च्या हंगामात डेव्हिड वॉर्नरने ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले. या हंगामात दिल्लीने निराशाजनक कामगिरी केली. गुणतालिकेत संघ नवव्या स्थानावर होता. यष्टिरक्षक फलंदाजाशिवाय यंदाचा हंगाम फ्रँचायझीसाठी अधिक त्रासदायक ठरु शकतो.

पंतबद्दल बीसीसीआय काय म्हणाले?

ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) बीसीसीआयने सांगितले होते की, रिहॅबमध्ये त्याच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. पंतने नेटमध्ये फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणाला सुरुवात केली आहे. तो सध्या त्याच्यासाठी तयार केलेल्या फिटनेस शेड्यूलचे अनुसरण करत आहे, ज्यामध्ये स्ट्रेंथ, फ्लेक्सिबिलिटी आणि धावणे समाविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT