Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 1st Test: बांगलादेशला फॉलोऑन न देण्यामागे टीम इंडियाची काय आहे प्लॅन?

भारतीय संघाने पहिल्या कसोटीत बांगलादेशला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Pranali Kodre

IND vs BAN: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. शुक्रवारी म्हणजेच या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवरच संपवला आणि 254 धावांची मोठी आघाडी मिळवली. पण असे असले तरी भारताने बांगलादेशला फॉलोऑन देण्याचे टाळले आहे.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव भारताने तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या तासाभरातच संपवला. त्यानंतर भारताला फॉलोऑन देण्याची संधी होती. पण भारताने फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघाच्या या निर्णयामागे जोखीम न पत्करण्याचे कारण असण्याचा कयास लावला जात आहे. कारण, या सामन्याचा शुक्रवारच्या दिवसाचा खेळासह आणखी दोन दिवसाचा वेळ बाकी आहे आणि बऱ्याचदा कसोटीत तिसऱ्या दिवशी खेळपट्टी फलंदाजांना मदत करताना दिसते.

चितगावमधील खेळपट्टीही तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी चांगली दिसत होती. त्यामुळे बांगलादेश चांगली फलंदाजी करून चौथ्या डावात भारताला दबावातही टाकू शकण्याची शक्यता होती. त्यामुळे ही जोखीम पत्करण्यापेक्षा भारताने फॉलोऑन न देता फलंदाजी करून आपली आघाडी आणखी वाढवून बांगलादेशला दबावात टाकण्याचा पर्याय स्विकारलेला असू शकतो.

कुलदीपची शानदार गोलंदाजी

भारताकडून बांगलादेशच्या पहिल्या डावात कुलदीप यादवने शानदार कामगिरी केली. त्याने 40 धावांत 5 विकेट्स घेतल्या. ही त्याची त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीही ठरली. त्याच्या 5 विकेट्समुळे भारताला बांगलादेशचा डाव दिडशे धावांवरच रोखण्यात यश मिळाले.

कुलदीपशिवाय मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल आणि उमेश यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तसेच या डावात बांगलादेशकडून कोणत्याच खेळाडूला 30 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यांच्याकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या.

भारताकडून तिघांचे अर्धशतक

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी अर्धशतके केली. पुजाराने 90, श्रेयसने 86आणि अश्विनने 58 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 404 धावांचा टप्पा गाठला. बांगलादेशकडून या डावात तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT