IND vs BAN: शतक हुकलं, पण श्रेयस अय्यरने भारतासाठी केलाय मोठ्ठा विक्रम, सूर्यकुमारलाही टाकलं मागे

श्रेयस अय्यरने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अर्धशतकी खेळीदरम्यान एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Shreyas Iyer
Shreyas Iyer Dainik Gomantak
Published on
Updated on

Shreyas Iyer: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात चट्टोग्रामला सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम केला आहे. त्याने हा विक्रम करताना सूर्यकुमालाही मागे टाकले.

या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात खेळताना श्रेयसने १९२ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार मारले. या खेळीसह तो २०२२ वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने या यादीत सूर्यकुमार यादवला पछाडत अव्वल क्रमांक गाठला.

Shreyas Iyer
IND vs BAN Test Day 1: पुजाराचे शतक हुकलं, अय्यरची वाटचाल शतकाच्या दिशेने...

सूर्यकुमारला चालू बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता श्रेयसला त्याचे अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याची संधी आहे. सध्या श्रेयसने यावर्षी ३८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४६.६५ च्या सरासरीने १४९३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच सूर्युमारने यावर्षी ४४ सामन्यांत भारताकडून ४०.६८ च्या सरासरीने १४२४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, श्रेयसने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूणच जगभरातील क्रिकेटपटूंमध्येही पहिल्या ५ जणांमध्ये जागा मिळवली आहे.

Shreyas Iyer
Shreyas Iyer किवींना नडतोच! न्यूझीलंडमध्ये भल्याभल्यांना न जमलेला केलाय पराक्रम

भारताचे पहिल्या कसोटीत वर्चस्व

बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव ४०४ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक ९० धावा केल्या. तसेच श्रेयसने ८६ आणि आर अश्विनने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशने ८ बाद १३३ धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून कोणालाही अद्याप अर्धशतक करता आलेले नाही. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com