Ravindra Jadeja | Nathon Lyon Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja: जड्डूनं नॅथन लायनला अवघ्या 24 तासांसाठी का केलं इंस्टाग्रामवर फॉलो?

रविंद्र जडेजाने इंस्टाग्रामवर केवळ ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनला 24 तासांसाठी फॉलो केले आहे.

Pranali Kodre

Ravindra Jadeja Following Nathan Lyon: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या सामन्यात भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दिल्लीत झालेला दुसरा कसोटी सामना भारताने रविवारी (19 फेब्रुवारी) जिंकला. दरम्यान, या सामन्यानंतर रविंद्र जडेजाने नॅथन लायनला 24 तासांसाठी इंस्टाग्रामवर फॉलो केले आहे.

Ravindra Jadeja Instagram Story

दिल्ली कसोटीनंतर जडेजाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यात दिसते की त्याने एक अकाउंटला फॉलो केले आहे. दरम्यान, जडेजाने या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'माझा मित्र नॅथन लायनला मी 24 तासांसाठी फॉलो करत आहे.' जडेजाची ही स्टोरी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायननेही रिपोस्ट केली आहे.

Nathon Lyon Instagram Story

दरम्यान, जडेजाची ही इंस्टाग्राम स्टोरी पाहून अनेकांना प्रश्न पडला की त्याने अशी स्टोरी का टाकली असावी. खरंतर इंस्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोवर्स असणाऱ्या जडेजा कोणालाही फॉलो करत नाही.

याबद्दल दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात लायनने जडेजाला आठवण करून दिली होती, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे.

लायन जडेजाला म्हणाला होता, 'तू मला इंस्टाग्रामवर फॉलोही नाही करत. मी तू मला फॉलो करण्याची वाट पाहात आहे. तू कोणालाच फॉलो करत नाही. तू फॉलो करू शकतो का?' जडेजा आणि लायनमधील हे संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाले होते. त्यानंतर आता जडेजाने लायनला 24 तासांसाठी फॉलो केले आहे.

रविंद्र जडेजाने दमदार पुनरागमन

रविंद्र जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्यापूर्वी गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे 5 महिने मैदानातून बाहेर होता. पण त्याने या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याचे हे पुनरागमन यशस्वी ठरले आहे.

त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत खेळताना 4 डावात गोलंदाजी करताना 17 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने पहिल्या सामन्यात 70 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या डावात भारतीय संघ संकटात असताना 26 धावांची खेळी केली होती. तसेच विराट कोहलीबरोबर 59 धावांची भागीदारी केली होती.

जडेजाला त्याच्या या शानदार कामगिरीमुळे दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Mumabi Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Goa Third District: 'तिसरा जिल्हा' झाल्याने लोकांची सोय होईल, कामे जलद होतील, ही न पटणारी गोष्ट..

SCROLL FOR NEXT