Ravindra Jadeja: चुकीला माफी नाही! जडेजाने बोटाला क्रिम लावल्याने ICC ने सुनावली मोठी शिक्षा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर आयसीसीने रविंद्र जडेजावर मोठी कारवाई केली आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव 132 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात एकूण 7 विकेट्स आणि 70 धावांची खेळी करणारा रविंद्र जडेजा सामनावीरही ठरला. मात्र, या सामन्यानंतर लगेचच त्याच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

जडेजावर आयसीसीने सामना शुल्काच्या 25 टक्के दंड आणि एक डिमिरिट पाँइंटची कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान रविंद्र जडेजाने मैदानावरील पंचांना न विचारता त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला क्रिम लावल्याने त्याला आयसीसीने शिक्षा सुनावली आहे.

Ravindra Jadeja
IND vs AUS, 1st Test: टीम इंडियाचा डावाने दणदणीत विजय, अश्विन-जडेजाच्या फिरकीने कांगारुंना गुंडाळलं

आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकार सांगण्यात आले आहे की जडेजा नागपूर कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचार संहितच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. जडेजाने आयसीसी आचार संहितेतील कलम 2.20 चे उल्लंघन केले आहे. हे कलम खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध आचरण करण्यासंबंधी आहे.

तसेच आयसीसीने असेही सांगितले आहे की 24 महिन्यांच्या कालावधीतील जडेजाची ही पहिलीच चूक होती. पुढील 24 महिन्यांच्या कालावधीसाठी त्याच्या डिसिप्लिनरी रेकॉर्डमध्ये एक डिमिरिट पाँइंटही सामील करण्यात आला आहे.

नक्की काय झाले?

नागपूर कसोटीत पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू असताना 46 षटकाच्या दरम्यान जडेजा मोहम्मद सिराजच्या तळहातावरून काहीतरी घेऊन त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला लावताना दिसला होता.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय संघव्यवस्थापनाने त्याने त्याचे बोट सुजल्याने क्रिम लावली असल्याचे सांगितले होते. पण त्याने मैदानावरील पंचांच्या परवानगीशिवाय बोटाला क्रिम लावली होती. त्यामुळे आता त्याला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja: पडदा उठला! जडेजाने बोटाला नक्की लावलं काय? टीम इंडियाकडून खुलासा

जडेजाने मान्य केली चूक

दरम्यान, जडेजाने आरोप मान्य केले असून आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सुनावलेली शिक्षाही मान्य केली आहे. त्यामुळे यावर कोणतीही अधिकृत सुनावणी होणार नाही. पायक्रॉफ्ट यांनी या प्रकरणाबद्दल चौकशी केली असता त्यांना जडेजाने ही क्रिम केवळ बोटाला सुज आल्यानेच लावली असल्याचे समजले. तसेच यामुळे चेंडूच्या हालचालीत कोणताही बदल झाला नव्हता.

जडेजावर मैदानावरील पंच नितीन मेनन आणि रिचर्ड इंलिंगवर्थ, तिसरे पंच मायकल गॉफ आणि चौथे पंच केएन अनंतपद्मनाभन यांनी परवानगीशिवाय क्रिम लावल्याचे आरोप केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com