IND vs AUS: जडेजाने ऑसी बॅट्समनला नाचवले, 7 विकेट्स घेत मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; पाहा Video

रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या असून यातील 5 फलंदाजांना त्याने बोल्ड केले आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak
Published on
Updated on

Ravindra Jadeja 7 Wickets Haul in Delhi Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताच्या रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या फिरकीपुढे नांगी टाकली.

जडेजा आणि अश्विन या दोघांनी मिळूनच ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील सर्व 10 विकेट्स घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे जडेजाने दुसऱ्या डावात 12.1 षटके गोलंदाजी करताना 42 धावा देत तब्बल 7 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने एक षटक निर्धाव टाकले. त्यामुळे हे जडेजाचे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja: पडदा उठला! जडेजाने बोटाला नक्की लावलं काय? टीम इंडियाकडून खुलासा

यापूर्वी जडेजाने 2016 साली इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत एका डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याने 48 धावा खर्च करत या 7 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, जडेजाने कसोटीमध्ये एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही 12 वी वेळ आहे. तसेच जडेजाने दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावातही ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात त्याच्या 10 विकेट्स झाल्या आहेत. कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेण्याची जडेजाची ही दुसरीच वेळ आहे.

जडेजाचे ऑस्ट्रेलियाला मोठे धक्का

जडेजाने दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन यांना बाद केले. यातील हँड्सकॉम्ब, कमिन्स आणि कुहनेमन शुन्यावरच बाद झाले.

तसेच जडेजाने या 7 क्रिकेटपटूंपैकी लॅब्युशेन, कॅरी, कमिन्स, लायन आणि कुहनेमन यांना त्रिफळाचीत केले आहे.

कसोटीतील जडेजाचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन

7/42 - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली, 2023

7/48 - विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2016

6/63 - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरू, 2017

6/138 - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डर्बन, 2013

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja: चुकीला माफी नाही! जडेजाने बोटाला क्रिम लावल्याने ICC ने सुनावली मोठी शिक्षा

जडेजाची अष्टपैलू कामगिरी

जडेजाने या सामन्यादरम्यान त्याच्या 250 कसोटी विकेट्सही पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे तो कसोटीत सर्वात जलद 2500 पेक्षा अधिक धावा आणि 250 विकेट्स हा टप्पा पार करणारा अष्टपैलू खेळाडू देखील ठरला आहे.

सामना रंगतदार वळणावर

दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 263 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या डावात सर्वबाद 262 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 1 धावेची आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावात जडेजा-अश्विनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला 113 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांनी 114 धावांची आघाडी घेतली आणि भारतासमोर विजयासाठी 115 धावांचे आव्हान ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com