Union Budget 2022 For Sports Dainik Gomantak
क्रीडा

अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा?

Union Budget 2022 For Sports: यंदा खेळाडू आणि क्रिडा संस्थांसाठीचा अर्थसंकल्प वाढवण्यात आला आहे

दैनिक गोमन्तक

काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी 2022 वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. बऱ्यापैकी क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देत असतांना यंदा खेळाडू आणि क्रिडा संस्थांसाठीचा अर्थसंकल्प वाढवण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रासाठीच्या बजेटमध्ये 300 कोटी रूपयांच्या वाढीची मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचवेळी या अर्थसंकल्पात काही संस्थांचा निधीदेखील कमी करण्यात आला आहे.

मात्र असे असले तरी यंदाच्या अर्थसंकल्पात नेहरू युवा केंद्र संगठन आणि राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थानच्या बजेटमध्ये काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे. 2021-22 च्या नेहरू युवा केंद्र संस्थेचे बजेट कमी करतानाच याआधी 365 कोटी रूपयांचा असलेला निधी आता 325 कोटी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी राष्ट्रीय युवा संस्थेचा निधीत एक कोटी रूपयांनी घट करण्यात आले आहे. त्यामुळे या संस्थेचा निधी 25 कोटींएवजी आता 24 कोटी रूपये करण्यात आला.

नेहरू युवा केंद्र संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरूण पिढीचे कौशल्य विकास प्रकल्पांकडे लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे. तामिळनाडू येथील राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थादेखील तरूण क्रिडापटूंसाठी काम करतात.

राष्ट्रीय पातळीच्या खेळांसाठी यंदा अर्थसंकल्पात कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात याच खेळांसाठी 100 कोटी रूपये होता. पण यंदा त्यात कपात करून फक्त 30 कोटी निधी ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर यंदा राष्ट्रीय पातळीवर खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT