IPL 2022: हार्दिक पंड्या म्हणाला... 'मी धोनी, चिकू अन् हिट मॅन सारखी कॅप्टन्सी करेन'

पांड्या (Hardik Pandya) पुढे म्हणाला, ''धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कर्णधार शैलीतून शिकलेले धडे मला आता प्रत्यक्षात लागू करायचे आहेत.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

हार्दिक पांड्याचा नवा लूक चाहत्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली प्रतिमा निर्माण करणारा हार्दिक पांड्या आता कर्णधार म्हणून दिसणार आहे. आयपीएल 2022, अहमदाबादच्या नवीन संघाने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून निवडले आहे. पांड्यासाठी कर्णधारपदाचा अनुभव एकदम नवा असणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या कर्णधारपदासाठी कोणतेही 'निर्धारित मानक' नाही, परंतु तो त्याचा 'गुरु' असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हार्दिक पांड्या यावेळी बोलताना म्हणाला, ''मी तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगू इच्छितो. जेव्हा एखाद्याची चांगली वेळ असते, तेव्हा त्याला कोणाच्या मदतीची गरज नसते. तुमचा दिवस चांगला नसतानाच तुम्हाला मदतीची गरज असते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.'' (Hardik Pandey Has been Named The Captain Of The Ahmedabad Franchise In The IPL)

पांड्या पुढे म्हणाला, ''धोनी, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कर्णधार शैलीतून शिकलेले धडे मला आता प्रत्यक्षात लागू करायचे आहेत. मी विराटमधून त्याची आक्रमकता आणि पॅशन निवडेन, त्याची एनर्जी जबरदस्त आहे. प्रत्येक परिस्थितीत संयम, शांतता आणि कूल राहण्याची कला मी माही भाईकडून शिकेन. खेळाडूंना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देण्याचे धडा मी रोहितकडून घेण्याचा प्रयत्न करेन.''

Hardik Pandya
IPL 2022: एस श्रीसंतने मेगा लिलावासाठी केली नोंदणी

IPL 2022 मध्ये हार्दिक पांड्या सर्वांना आश्चर्यचकित करेल!

गेल्या काही वर्षांपासून हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीच्या तंदुरुस्तीबाबत राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्यात 'संवादाचा अभाव' असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता पांड्याने मंगळवारी स्पष्ट केले की, "प्रत्येकाला" त्याच्या स्थितीबद्दल माहिती असते. '. पाठीच्या समस्येमुळे पांड्या दोन वर्षांपासून नियमितपणे गोलंदाजी करू शकला नाही, परंतु आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान त्याला सर्वांना 'चकित' करायचे आहे. फ्रँचायझीने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान पंड्याने पीटीआयला सांगितले की, 'त्यांना माहित आहे की मी कोणत्या स्तरावर आहे (In terms of bowling fitness). सर्वांना याची माहिती देण्यात आली आहे.' पांड्याने राष्ट्रीय निवडकर्त्यांना स्पष्ट केल्याचे समजते की, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याचा विचार करु नये कारण तो सध्या त्याच्या गोलंदाजीवर काम करत आहे.'

हार्दिक पांड्याला टीकेची पर्वा नाही

टी-20 विश्वचषकादरम्यान (T20 World Cup) पांड्यावर बरीच टीका झाली होती. परंतु तो याला त्याने फारसे महत्व दिले नाही. तो म्हणाला, 'माझ्यासाठी गोलंदाजी न करणे खूप आव्हानात्मक होते. आणि मी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नेहमीच योगदान दिले आहे.

Hardik Pandya
IPL 2022: केकेआरने माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षकाला दिली मोठी जबाबदारी

तो पुढे म्हणाला, ''सकारात्मक टीका नेहमीच चांगली असते, परंतु टीका सहसा मला त्रास देत नाही कारण मला माहित आहे की, मी काय करत आहे. मी किती कष्ट केले हे मला माहीत आहे. निकालाला जास्त महत्त्व न देता मी नेहमीच प्रक्रियेचा अवलंब करुन मेहनत घेतली आहे. तुम्ही खरी मेहनत केली की परिणाम आपोआपच दिसून येतात.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com