West Indies Team ICC
क्रीडा

WI vs ENG: आंद्रे रसेलचं बॉलिंगनंतर बॅटिंगमध्येही तुफान! वेस्ट इंडिजकडून पहिल्या T20मध्ये इंग्लंड पराभूत

Pranali Kodre

West Indies won 1st match of T20I Series against England at Barbados:

वनडे मालिकेत वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता टी20 मालिकेची सुरुवातही विजयाने केली आहे. पाहुण्या इंग्लंडला वेस्ट इंडिजने टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ४ विकेट्सने पराभूत केले. वेस्ट इंडिजच्या विजयात अष्टपैलू आंद्रे रसेलची कामगिरी महत्त्वाची ठरली.

बार्बाडोसला झालेल्या या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजसमोर 172 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 18.1 षटकात 6 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

इंग्लंडने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून सलामीवीर ब्रेंडन किंगने आक्रमक सुरुवात केली होती. पण त्याला 12 चेंडूत 22 धावांवर तिसऱ्या षटकात ख्रिस वोक्सने बाद केले. त्यानंतर काईल मेयर्स आणि शाय होप यांनी संघाचा डाव सावरताना ७० धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र, मेयर्स 8 व्या षटकात 21 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. पाठोपाठ निकोलस पूरनही 13 धावांवर माघारी परतला, तर शिमरॉन हेटमायरलाही खास काही करता आले नाही. पण या विकेट्स जात असताना शाय होपने एक बाजू सांभाळली होती त्याला आधी कर्णधार रोवमन पॉवेलने साथ दिली.

मात्र 15 व्या षटकात रेहान अहमदने वेस्ट इंडिजला दोन मोठे दणके दिले. त्याने या षटकात शाय होप आणि रोमारियो शेफर्ड यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. होप 30 चेंडूत 36 धावा करून बाद झाला, तर शेफर्ड शुन्यावरच बाद झाला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ थोडा दबावात आला होता.

परंतु, अखेरीस पॉवेल आणि आंद्र रसेलने आक्रमण केले. या दोघांनी मोठे फटके खेळत नाबाद 49 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजचा विजय पक्का केला. पॉवेलने 15 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावा केल्या, तर रसेलने 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 29 धावा केल्या.

इंग्लंडकडून रेहान अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर आदिल राशीदने 2 विकेट्स घेतल्या आणि ख्रिस वोक्सने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुरुवातीलाच इंग्लंडकडून सलामीवीर फिल सॉल्ट आणि कर्णधार जॉस बटलरने आक्रमण चढवले. त्यांनी 6 षटकांच्या आतच 70 धावा धावफलकावर लावल्या होत्या.

पण सातव्या षटकात ही जोडी रसेलनेच तोडली. त्याने सॉल्टला शिमरॉन हेटमायरच्या हातून झेलबाद केले. सॉल्टने 20 चेंडूत 40 धावा केल्या. त्यानंतर विल जॅक्स 17 धावांवर बाद झाला, तर बटलरला 11 व्या षटकात अकिल हुसेनने बाद केले. बटलरने 31 चेंडूत 39 धावा केल्या.

हॅरी ब्रुक (1), बेन डकेट (14) आणि सॅम करनही (13) स्वस्तात बाद झाले. त्याचबरोबर लियाम लिव्हिंगस्टोनही अधिक धोकादायक होणार नाही, याची काळजी रसेलने घेतली. त्याने त्याला 19 चेंडूत 27 धावांवर असताना त्रिफळाचीत केले.

त्यावेळी इंग्लंडच्या 18.1 षटकात 7 बाद 167 धावा झाल्या होत्या. पण नंतरच्या 3 विकेट्स इंग्लंडने अवघ्या 8 चेंडूत 4 धावांत गमावल्या. त्यामुळे इंग्लंडचा डाव 19.3 षटकात 171 धावांवरच संपुष्टात आला.

वेस्ट इंडिजकडून आंद्र रसेलने 4 षटकात अवघ्या 19 धावा देत 3 विकेट्स घेत या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी केली. तसेच अल्झारी जोसेफनेही 3.3 षटकात 3 विकेट्स घेतल्या, मात्र त्याने तब्ब 54 धावा खर्च केल्या. रोमारियो शेफर्डने 2 विकेट्स घेतल्या, तर अकिल हुसेन आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT