Islamabad Airport Drone Attack: पाकच्या एअर स्ट्राईकला तालिबानचं चोख उत्तर! इस्लामाबाद विमानतळावर ड्रोन हल्ला; अनेक सैनिक ठार झाल्याचा दावा

Taliban Attack on Islamabad Airport: अफगाणिस्तानमध्ये काबुल आणि कंदहारसह अनेक प्रांतांमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तालिबानने थेट इस्लामाबाद आणि पेशावरला लक्ष्य करत चोख प्रत्त्युत्तर दिले.
Taliban Attack on Islamabad Airport
Islamabad Airport Drone AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Afghanistan Conflict: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आधीच जागतिक राजकारण तापलेले असताना, आता दक्षिण आशियात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान युद्धाची नवी ठिणगी पडली. पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानमध्ये काबुल आणि कंदहारसह अनेक प्रांतांमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तालिबानने थेट इस्लामाबाद आणि पेशावरला लक्ष्य करत चोख प्रत्त्युत्तर दिले. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून सीमेवर युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानची राजधानी काबुल, कंदहार, पकटिया आणि पकटिका प्रांतांत बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात कंदहारमधील तालिबानच्या 'अल-बद्र कोअर'च्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा तिथे तालिबानचे काही वरिष्ठ कमांडर उपस्थित होते. पाकिस्तानने असा दावा केला की, त्यांनी केवळ 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) च्या तळांना लक्ष्य केले, परंतु अफगाणिस्तानने हा दावा फेटाळून लावत हा सामान्य नागरिकांवरील हल्ला असल्याचे म्हटले. 'टोलो न्यूज'च्या रिपोर्टनुसार, कंदहारमधील अहमद शाह बाबा विमानतळाजवळ भीषण स्फोट झाले असून एका खाजगी तेल शुद्धीकरण प्रकल्पालाही (Refinery) लक्ष्य करण्यात आले.

Taliban Attack on Islamabad Airport
Taliban New Penal Code: बायकोला हाडं तुटेपर्यंत मारणं आता 'कायदेशीर', तालिबानचा नवा क्रूर कायदा; अफगाणिस्तानात पुन्हा महिलांच्या हक्कांची पायमल्ली

पाकिस्तानच्या (Pakistan) या आक्रमकतेला तालिबानने अनपेक्षित आणि तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी शुक्रवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे विमानतळावरील विमानांची ये-जा तातडीने थांबवावी लागली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाच्या फायटर जेट्सना आकाशात झेप घ्यावी लागली. इतकेच नाही तर, तालिबानने इस्लामाबादमधील फैजाबाद येथील 'हम्जा' या मोठ्या लष्करी तळालाही लक्ष्य केले, ज्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

Taliban Attack on Islamabad Airport
Taliban Pakistan War: तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक, पाकचे 12 सैनिक ठार, अनेक चौक्या ताब्यात

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की, त्यांच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. पेशावरमध्येही तालिबानने ड्रोन स्ट्राईक करुन पाकिस्तानी लष्कराच्या कोहाट सेंट्रल कमांड आणि कोहाट ब्रिगेड कॅम्पवर हल्ले चढवले. या हल्ल्यात डझनावारी पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून डझनाहून अधिक लष्करी चौक्या उद्ध्वस्त झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला. तालिबानच्या (Taliban) या वेगवान कारवाईमुळे पेशावरपासून रावळपिंडीपर्यंत हाहाकार माजला आहे.

Taliban Attack on Islamabad Airport
Taliban Attack Video: लाँग रेंजवरुन अचूक निशाणा साधत केला खेळ खल्लास; 40 पाकिस्तानी जवान ठार; तालिबानी संघटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहा

दुसरीकडे, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानमधील निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप होत आहे. टीटीपीच्या नावाखाली पाकिस्तान मासूम मुले आणि महिलांना लक्ष्य करत असल्याचे अफगाण नागरिकांनी सांगितले. एका पीडित अफगाण नागरिकाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, "हवाई हल्ल्यात आमचे घर आमच्यावरच कोसळले. माझा धाकटा भाऊ ढिगाऱ्याखाली बेशुद्ध होता. आम्ही कसेबसे पत्नी, मुलगी आणि आईला बाहेर काढून रुग्णालयात नेले." पाकिस्तानच्या या कारवाईमुळे अफगाणिस्तानमध्ये संतापाची लाट असून दोन्ही देशांमधील संबंध आता अशा वळणावर आले आहेत जिथून परतणे कठीण दिसत आहे. या संघर्षामुळे संपूर्ण दक्षिण आशियातील शांतता धोक्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com