WI vs ENG: वेस्ट इंडिजने 25 वर्षांनंतर इंग्लंडला घरच्या मैदानावर हरवले, टीम बटलरची लाजिरवाणी कामगिरी सुरूच

Jos Buttler: भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. एकदिवसीय विश्वचषकानंतरही इंग्लंड संघाच्या कामगिरीत फारशी सुधारणा झालेली नाही.
West Indies England ODI Series
West Indies England ODI SeriesDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies beat England at home after 25 years:

एकदिवसीय विश्वचषकानंतरही इंग्लंड संघाच्या कामगिरीत फारशी सुधारणा झालेली नाही. विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. पण भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती.

विश्वचषकानंतर इंग्लंड संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण, येथेही इंग्लंडच्या हाती निराशाच पडली आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना वेस्ट इंडिजने जिंकला. हा सामना जिंकून वेस्ट इंडिजने मालिकाही जिंकली.

वेस्ट इंडिज संघाने 25 वर्षांनंतर इंग्लंडला मायदेशात एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.

याआधी 1998 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिकेत पराभूत केले होते.

West Indies England ODI Series
Cooch Behar Trophy: पंजाबने उभारला 418 धावांचा डोंगर; गोव्याचा युवा संघ फलंदाजी विसरला

शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडचा चार विकेट राखून पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली.

इंग्लंडचा निम्मा संघ अवघ्या 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पावसामुळे सामना कमी षटकांचा झाला.

बेन डकेट आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या खेळीमुळे इंग्लंडचा संघ 40 षटकांत 206 धावा करण्यात यशस्वी ठरला. संघाकडून बेन डकेटने सर्वाधिक 71 धावा केल्या. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनच्या बॅटमधून 45 धावा आल्या.

West Indies England ODI Series
IND vs ENG 2nd T20: तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडची विजयी आघाडी; टीम इंडियाचा दारुण पराभव!

पावसामुळे वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी 34 षटकांत 188 धावांची गरज होती. वेस्ट इंडिजचा सलामीवीर अॅलिक अथानाझने 45 धावा केल्या. तर किसी कार्टीनेही अर्धशतक झळकावले.

रोमॅरियो शेफर्डने तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली आणि संघाला चार विकेट्सने विजय मिळवून दिला.

वेस्ट इंडिजने अवघ्या 31.4 षटकांत लक्ष्य गाठले. आता या दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, जी 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com