MS Dhoni Hardik Pandya Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya: 'तू धोनी होऊ शकत नाही!', हार्दिकने विजयी षटकार मारला, तरीही का भडकले चाहते?

Pranali Kodre

Fans furious after Hardik Pandya Winning Six denies Tilak Varma chance to hit fifty: भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला.

गयाना येथे झालेल्या या सामन्यात विजय मिळवल्याने भारताने या मालिकेतील आव्हान कायम राखले आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने विजयी षटकर मारला. मात्र असे असले तरी तो सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यामागे कारण म्हणजे तिलक वर्माचे केवळ एका धावेने हुकलेले सलग दुसरे अर्धशतक.

नक्की झालं काय?

झाले असे की या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी आक्रमक खेळताना 87 धावांची भागीदारी केली होती. पण सूर्यकुमार 44 चेंडूत 83 धावांची खेळी करून बाद झाला.

दरम्यान, त्यांच्यात झालेल्या भागीदारीने भारतीय संघासाठी विजयाचा मार्ग सुकर झाला होता होता. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक आणि तिलक यांनी डाव पुढे नेला. अखेरच्या तीन षटकात भारताला केवळ 6 धावांची गरज होती.

यावेळी रोव्हमन पॉवेलने गोलंदाजी केलेल्या 17 व्या पहिल्या चार चेंडूत हार्दिक आणि तिलक यांनी एक-एक धावा काढत चार धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर तिलकने एकेरी धाव घेतली होती. त्यामुळे तो 49 धावांवर पोहचला होता.

पाचव्या चेंडूवर हार्दिक स्ट्राईकवर आला, त्यावेळी भारताला विजयासाठी 2 धावांचीच गरज होती आणि तिलकला अर्धशतकासाठी 1 धावेची गरज होती.

त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की अद्याप 14 चेंडू बाकी असल्याने हार्दिक एक धाव घेऊन तिलकला स्ट्राईक देईल किंवा या षटकातील उर्वरित दोन्ही चेंडू खेळून काढेल.

जेणेकरून 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिलक स्ट्राईकला येईल आणि भारताला विजय मिळवून देण्याबरोबरच त्याचे अर्धशतकही पूर्ण होईल.

मात्र, हार्दिकने 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचला आणि भारताने हा सामना 13 चेंडू राखूनच जिंकला.

हार्दिकवर टीका

दरम्यान, यामुळे हार्दिकवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेकांच्या मते हार्दिकने मोठे मन दाखवून तिलकला स्ट्राईक देऊन अर्धशतक पूर्ण करण्याची संधी द्यायला हवी होती कारण भारतीय संघासाठी विजयाची केवळ औपचारिकता राहिली होती. अनेक चाहत्यांनी हार्दिकला स्वार्थी म्हणत टीका केली आहे.

धोनीची आठवण

तसेच या घटनेमुळे अनेकांना एमएस धोनीची आठवण झाली आहे. साल 2014 मध्ये टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने शानदार 44 चेंडूत नाबाद 72 धावांची खेळी केली होती.

त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ 1 धावेची गरज असताना धोनीला 19 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी शॉट मारण्याची संधी होती. मात्र, धोनीने या चेंडूवर विराटसाठी एकही धाव घेतली नाही.

ज्यामुळे 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट स्ट्राईकवर आला आणि त्याला विजयी धाव घेण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी विराटने चौकार मारला आणि भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे.

सध्या 5 सामन्यांच्या या टी20 मालिकेत वेस्ट इंडिज पहिल्या तीन सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT