Hardik Pandya: 'विंडिज बोर्ड नोंद घेईल अशी आशा...'. कॅप्टन हार्दिकने सुनावले; विराटचेही मानले आभार

WI vs INDI, 3rd ODI: हार्दिक पंड्याने पुढच्यावेळी सुविधा चांगल्या मिळतील अशी आशा वेस्ट इंडिज बोर्डाकडे व्यक्त केली आहे.
Hardik Pandya | Virat Kohli
Hardik Pandya | Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Hardik Pandya Reveals How Virat Kohli Helped Him: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 अशा फरकाने जिंकला.

या विजयात प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्यानेही महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, त्याने सामन्यानंतर सांगितले की विराट कोहलीशी झालेली चर्चा त्याला उपयुक्त ठरली. हार्दिकने या सामन्यात 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 70 धावांची नाबाद खेळी केली.

Hardik Pandya | Virat Kohli
WI vs IND, 3rd ODI: भारताचा मालिका विजय! फलंदाजांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी उडवली विंडिजची दाणादाण

त्याला ही खेळी करण्यासाठी विराटबरोबरचा संवाद उपयुक्त ठरल्याचे सांगताना तो म्हणाला, 'सामन्यापूर्वी विराटबरोबर चांगली चर्चा झाली होती. त्याला वाटत होते की मी खेळपट्टीवर थोडा वेळ घालवावा आणि 50 षटकांच्या प्रकाराशी जुळवून घ्यावे. त्याने त्याचा अनुभव माझ्याशी शेअर केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.'

'जेव्हा तुम्ही एक चेंडूवर शॉट खेळता आणि लय मिळवता, तेव्हा गोष्टी वेगळ्याप्रकारे घडतात. 350 धावा करणे नेहमीच महत्त्वाचे ठरते.'

भारताकडून हार्दिकव्यतिरिक्त शुभमन गिल (85), इशान किशन (77) आणि संजू सॅमसन (51) यांनीही अर्धशतके केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या होत्या.

Hardik Pandya | Virat Kohli
Hardik Pandya on MS Dhoni: 'वाटलं 10 रन वाढवतोय...', CSK विरुद्ध पराभवानंतर धोनीबद्दल हार्दिकची लक्षवेधक प्रतिक्रिया

दरम्यान, हार्दिकने असेही म्हटले की वेस्ट इंडिज पुढच्यावेळी आणखी चांगल्या सुविधा मिळतील.

तो म्हणाला, 'हे मी खेळलेल्या सर्वोत्तम मैदानांपैकी एक आहे. आम्ही जेव्हा पुढच्यावेळी वेस्ट इंडिजला येऊ तेव्हा गोष्टी आणखी चांगल्या होतील. प्रवासासारख्या काही गोष्टी आहेत. आशा आहे की वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड नोंद घेईल आणि काहीही नंतर अडचणी नसतील. आम्हाला चैनीच्या गोष्टी नको आहेत, पण किमान काही मुलभूत गोष्टींची काळजी घेतली जावी.'

खरंतर भारतीय क्रिकेट संघाला वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी प्रवासाबाबत काही समस्यांना तोंड द्यावे लागले होते. याबाबत भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रारही केली होती.

दरम्यान, भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 35.3 षटकात 151 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांना ही मालिकाही गमवावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com