Virat Kohli Head Heated Argument On Field Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: मॅचनंतरही हायव्होल्टेज ड्रामा! विराट कोहली भडकला; भरमैदानात ट्रॅव्हिस हेडला…, VIDEO होतोय व्हायरल

Virat Kohli Head Heated Argument On Field: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील अटीतटीच्या सामन्यानंतर क्रिकेट जगताला हादरवून टाकणारा एक प्रकार समोर आला.

Manish Jadhav

Virat Kohli Ignores Travis Head After Match: आयपीएल 2026 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील अटीतटीच्या सामन्यानंतर क्रिकेट जगताला हादरवून टाकणारा एक प्रकार समोर आला. सामना संपल्यानंतर हस्तांदोलनादरम्यान (हँडशेक) आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडशी हात न मिळवता त्याला थेट डावलून पुढे जाणे पसंत केले.

मैदानावर झालेल्या या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात सनरायझर्स हैदराबादने बंगळुरुला 55 धावांनी धूळ चारली. मात्र, सामन्याच्या निकालापेक्षा विराट आणि हेड यांच्यातील हा वाद सध्या क्रीडा वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यातील हा तणाव सामन्याच्या दरम्यानच सुरु झाला होता. हैदराबादने दिलेल्या 256 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या डावातील सुरुवातीच्या षटकांमध्ये दोघांत जोरदार बाचाबाची पाहायला मिळाली. शिवांग कुमारच्या षटकात जेव्हा आरसीबी वेगाने धावा कुटत होती, तेव्हा विराटने ट्रॅव्हिस हेडकडे पाहून त्याला गोलंदाजीसाठी येण्याचे खुले आव्हान दिले.

एवढेच नाही तर विराटने 'इम्पॅक्ट प्लेयर'चा इशारा करत हेडला चिडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर हेडने हसून प्रतिक्रिया दिली असली तरी मैदानावरील वातावरण कमालीचे तापले होते. यापूर्वी हैदराबादच्या फलंदाजीदरम्यान रसिक डार सलामने जेव्हा ट्रॅव्हिस हेडला एका उत्कृष्ट यॉर्करवर बोल्ड केले, तेव्हा विराटने मैदानावर अत्यंत आक्रमकपणे जल्लोष केला होता.

या मोठ्या सामन्यात विराट कोहलीची बॅट फारशी चालली नाही. साकिब हुसैनच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात विराट अवघ्या 15 धावांवर झेलबाद झाला. दुसरीकडे, फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने गोलंदाजी करताना रजत पाटीदारची महत्त्वाची विकेटही काढली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 255 धावांचा डोंगर उभा केला होता. अभिषेक शर्माने 22 चेंडूत 56, इशान किशनने 44 चेंडूत 79 आणि हेन्रिक क्लासेनने 24 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी खेळली होती. प्रत्युत्तरात आरसीबीचा डाव 200 धावांवरच मर्यादित राहिला.

या मोठ्या पराभवानंतरही आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिली. बंगळुरुने गुजरात टायटन्ससह टॉप-2 मध्ये आपले स्थान पक्के केले. आता हे दोन बलाढ्य संघ 26 मे रोजी धरमशाला येथे होणाऱ्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात फायनलच्या तिकिटासाठी एकमेकांसमोर ठाकणार आहेत. मात्र, आगामी सामन्याआधी विराट आणि हेड यांच्यातील या वादाची ठिणगी आयपीएलचा थरार आणखी वाढवणारी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT