'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

West Bengal Minister Arjun Singh Claims: बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आणि तारिक रेहमान सत्तेत आल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले.
West Bengal Minister Arjun Singh Claims
West Bengal Minister Arjun Singh ClaimsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

West Bengal Minister Arjun Singh Claims: बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आणि तारिक रेहमान सत्तेत आल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले. या तणावात आता कुठे थोडाफार बदल जाणवत असतानाच, एका विधानामुळे वातावरण अधिकच संवेदनशील बनले. येत्या 16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल आणि तिथे झालेल्या हिंदूंच्या हत्यांचा बदला घेतला जाईल, असा दावा पश्चिम बंगालचे मंत्री अर्जुन सिंह यांनी केला.

विशेष म्हणजे, 16 डिसेंबर रोजीच बांगलादेशचा विजय दिवस असतो आणि याच दिवशी शेख हसीना मायदेशी परतणार असल्याचेही सांगितले जात आहे. दुसरीकडे, शेख हसीना यांच्या परतीच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमधील (Bangladesh) राजकीय वातावरण चांगलेच तापले. बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी अत्यंत कडक भूमिका घेत, हसीना या सामान्य प्रवासी नसून त्यांना केवळ कैद्याप्रमाणे हातात बेड्या घालूनच परत आणले जाईल, असे स्पष्ट केले. इच्छा आणि वास्तव यात मोठा फरक असून, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे परत येऊ दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

West Bengal Minister Arjun Singh Claims
Sheikh Hasina: 'हातकड्या घालूनच परत आणू...', शेख हसीना यांच्या घरवापसीवर बांगलादेशी परराष्ट्र मंत्र्यांची धमकी; 16 डिसेंबरचा प्लॅन फसणार

दरम्यान, शेख हसीना यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मायदेशी जाण्यासाठी बांगलादेशच्या राष्ट्रीय विमान कंपनीचा वापर करण्याची मागणी केली. 5 ऑगस्ट 2024 रोजी त्यांना बांगलादेशी विमानाने भारतात आणण्यात आले, त्यामुळे दिल्लीहून ढाक्याला जाण्यासाठी विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणी पुढे आली.

West Bengal Minister Arjun Singh Claims
Sheikh Hasina: 499 दिवसांनंतर मायदेशी परतणार शेख हसीना! 16 डिसेंबरच तारीख का निवडली? बांगलादेशात पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा

मात्र, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या मुख्य सरकारी वकिलांनी ही मागणी फेटाळून लावत ती केवळ वेडेपणाची कल्पना असल्याचे म्हटले. तसेच, विमानाबाबत भारताशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसून, त्या परत आल्यास तर त्यांना तात्काळ अटक करुन तुरुंगात पाठवले जाईल, असा इशाराही बांगलादेशच्या मंत्र्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.