Virat Kohli Viral Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Viral Video: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीच्या फलंदाजीसोबतच मैदानाबाहेरील एक मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Sameer Amunekar

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीच्या फलंदाजीसोबतच मैदानाबाहेरील एक मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान विराट डगआउटमध्ये बसलेला असताना प्रेक्षकांमधील एका चाहत्याने अचानक आपला बूट काढून हवेत दाखवला. हा प्रकार पाहून विराट काही क्षणांसाठी चांगलाच गोंधळलेला दिसला. त्याचा हा रिअ‍ॅक्शन असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

चाहत्याने अचानक बूट हवेत दाखवला

तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान विराट कोहली डगआउटच्या परिसरात बसून वातावरणाचा आनंद घेत होता. त्याचवेळी स्टेडियममधील काही चाहते विराटचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान एका चाहत्याने पायातील बूट काढला आणि तो विराटच्या दिशेने हवेत दाखवण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला विराटला चाहत्याने बूट का दाखवला, हे काही क्षण समजले नसल्याचे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून जाणवत होते. त्यामुळे विराटचा हा उत्सुक आणि आश्चर्यचकित करणारा रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाला.

बूट पाहून विराटही झाला आश्चर्यचकित

नंतर हा प्रकार कोणत्याही गैरप्रकाराशी संबंधित नसून त्या चाहत्याला विराटशी संबंधित ब्रँडचा बूट दाखवायचा असल्याचे समोर आले. विराट कोहलीच्या One8 ब्रँडशी संबंधित नवीन एडिशनचा बूट त्याच्याकडे असल्याचे दाखवण्यासाठी चाहत्याने तो हवेत उंचावल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे सुरुवातीला गोंधळलेला विराट नंतर हा प्रकार लक्षात आल्यावर चाहत्याकडे पाहताना दिसला. सोशल मीडिया यूजर्सना विराटचा हा नैसर्गिक रिअ‍ॅक्शन चांगलाच आवडला असून व्हिडिओवर विविध मजेशीर प्रतिक्रिया उमटत आहेत.

विराटच्या One8 बुटांचीही चर्चा

विराट कोहलीच्या One8 ब्रँडच्या क्रिकेट शूजचीही या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, Seam XVIII Signature - Test Red या मॉडेलची अधिकृत किंमत 9,230 रुपये असल्याचे सांगितले जाते. तर संबंधित चाहत्याने दाखवलेल्या दुसऱ्या बूटाची किंमत वेबसाइटवर 13,999 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध विराटची कामगिरी कशी राहिली?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराटने दमदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्याने 88 चेंडूंमध्ये नाबाद 139 धावा करत शानदार शतक झळकावले. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 9 षटकार ठोकले.

दुसऱ्या सामन्यात विराटने 19 चेंडूंत 29 धावा केल्या. मात्र, मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो खातेही न उघडता बाद झाला. त्यामुळे मालिकेची सुरुवात शतकाने करणाऱ्या विराटचा शेवट गोल्डन डकने झाला.

आता पुढील वनडे मालिकेची प्रतीक्षा

वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघाच्या पुढील वनडे मालिकेकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आगामी मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये दिसणार असल्याने दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT