Goa Winter Weather: गोव्यात थंडीची चाहूल! पणजीचे किमान तापमान 20 अंशांवर, पहाटे आणि रात्री गारवा; दुपारी मात्र उन्हाचा तडाखा कायम

Panaji Temperature 20.4 Degrees: गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी पणजीत किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
Panaji Temperature 20.4 Degrees
Goa Winter WeatherDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मान्सूनोत्तर पाऊस ओसरल्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी पणजीत किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.२ अंशांनी कमी होते. त्यामुळे पहाटे आणि रात्री गारवा जाणवत आहे. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा कायम आहे.

गुरुवारी दुपारी कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशांनी जास्त होते. सकाळी आणि रात्री सौम्य थंडी, तर दुपारी उष्णता अशा संमिश्र वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी थंडीत वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्यावी. तसेच, दुपारच्या उष्णतेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Panaji Temperature 20.4 Degrees
Goa Politics: सावर्डेत भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग; विद्यमान आमदार गणेश गावकरांना डावलण्याची मागणी करत सहा नेते एकवटले

पहाटे धुके आणि दव

पणजीसह राज्याच्या विविध भागांत पहाटे धुके आणि दव पडत असून, थंडीचा अनुभव येत आहे. सत्तरी आणि डिचोली परिसरासह घाटालगतच्या भागांत पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. पुढील दोन ते तीन दिवस कमाल व किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.