'FC Goa'च्या गोटात मोठी उलथापालथ! मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांची एक्झिट, क्लबने पोस्ट करत दिली माहिती

Gauramangi Singh leaves FC Goa: भारतीय फुटबॉलमधील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एफसी गोवा (FC Goa) आणि मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
Gauramangi Singh leaves FC Goa
Gauramangi Singh leaves FC GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारतीय फुटबॉलमधील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एफसी गोवा (FC Goa) आणि मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदावर आता बदल झाला आहे.

परस्पर संमतीने घेतला निर्णय

एफसी गोवा क्लबने अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. क्लब आणि गौरमांगी सिंग यांनी चर्चा करून परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. हा निर्णय त्वरित लागू होणार असल्याने संघाच्या आगामी वाटचालीत प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार, याकडे फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

क्लबकडून गौरमांगी सिंग यांचे आभार

गौरमांगी सिंग यांच्या कार्यकाळातील प्रयत्न आणि समर्पणाबद्दल एफसी गोवा व्यवस्थापनाने त्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी क्लबकडून शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

गौरमांगी क्लब पातळीवर सर्वाधिक काळ (२००७-२०१२) गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघातर्फे खेळले. भारतातर्फे ते २००६ ते २०१३ या कालावधीत ७२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. गौरमांगी यांनी सहा आंतरराष्ट्रीय गोलही केले आहेत. ते बंगळूर युनायटेडचे प्रशिक्षक होते, २०२२ मध्ये ते एफसी गोवा संघात साहाय्यक प्रशिक्षक बनले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.