

पणजी: चालू पर्यटन हंगामात अवघ्या ५० दिवसांत स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांसह तब्बल २,९६६ जणांनी समुद्रकिनाऱ्यांवर दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पोहण्याच्या सत्रांमध्ये सहभाग घेतला. ही संख्या मागील संपूर्ण पर्यटन हंगामातील ३,८६७ सहभागींच्या तीन-चतुर्थांशहून अधिक असल्याचे दृष्टी मरीनने स्पष्ट केले.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत दृष्टी मरीनने सहा समुद्रकिनाऱ्यांवर हा उपक्रम राबवला. यामध्ये दक्षिण आणि उत्तर गोव्यातील अनुक्रमे कोलवा आणि कळंगुट या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर सहभागींची संख्या लक्षणीय राहिली. १९ नोव्हेंबर २०२५ ते १ जून २०२६ या मागील पर्यटन हंगामात सात समुद्रकिनाऱ्यांवर राबवलेल्या ‘सागर सफर’ उपक्रमात ३,८६७ जणांनी सहभाग नोंदवला होता. गेल्या दोन महिन्यांत कोलवा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक १,५४४ जणांनी, कळंगुट येथे १,११० जणांनी तर उतोर्डा येथे १८५ जणांनी या सत्राचा लाभ घेतला.
पर्यटकांत उत्साह
दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी म्हणाले की, राज्यात येणारे पर्यटक समुद्राचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक असतात. ‘सागर सफर’ उपक्रमामुळे त्यांना आनंदासोबतच समुद्राची योग्य माहिती मिळते आणि त्याच्याप्रती आदर बाळगण्याची जाणीव होते.
प्रशिक्षित जीवरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागींना समुद्राची स्थिती, पाण्याचे प्रवाह, ध्वज प्रणाली आणि सुरक्षितपणे पोहण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. यामुळे समुद्राची माहिती नसलेल्या, विशेषतः देशाच्या अंतर्गत भागातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये आणि पहिल्यांदाच पोहणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आतापर्यंत ६,८३३ जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.