Drug Seizure: उत्तर गोव्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; 1.92 कोटींचा साठा जप्त, 94 जणांना अटक

Goa Drug Crime: उत्तर गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम तीव्र करत नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण ७४ गुन्हे दाखल केले आहेत.
Goa Drug Crime
Drug SeizureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: उत्तर गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम तीव्र करत नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण ७४ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये आतापर्यंत ९४ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये २६ गोमंतकीय, ५४ बिगरगोमंतकीय आणि १४ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

पोलिसांनी या मोहिमेअंतर्गत सुमारे १,९२,७३,४२० रुपये किमतीचा एकूण ४९ किलो २२६ ग्रॅम २८० मिलीग्रॅम अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अमली पदार्थांच्या बेकायदेशीर हालचालींवर कठोर कारवाई करण्यास पोलीस कटिबद्ध असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Goa Drug Crime
Goa Politics: सावर्डेत भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग; विद्यमान आमदार गणेश गावकरांना डावलण्याची मागणी करत सहा नेते एकवटले

हणजूण पोलिसांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सोनारखेड, आसगाव येथे क्रॉसजवळ कारवाई करत आकर्ष कांबोज (धुळेर) याच्या ताब्यातून ०.१५ ग्रॅम वजनाचे १४ एलएसडी पेपर ब्लॉट्स जप्त केले. सुमारे १,४०,००० रुपये किमतीचा हा साठा ग्राहकांना विकण्यासाठी आणण्यात आला होता. चौकशीदरम्यान हा माल निसार अली याच्याकडून घेतल्याचे आकर्षने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ११ नोव्हेंबर २०२६ रोजी निसार अली आगा (२६, करासवाडा) याला अटक केली.

१० नोव्हेंबर २०२६ रोजी हणजूण पोलिसांच्या पथकाने शिवोली येथील फुटबॉल मैदानाजवळ छापा टाकून हिमाचल प्रदेशचा मूळ रहिवासी असलेल्या मनीष नावाच्या संशयिताकडून सुमारे ६७,००० रुपये किमतीचा ६७ ग्रॅम चरस जप्त केला. पेडणे पोलिसांनी खालचावाडा, विर्नोडा येथून तुये इलेक्ट्रॉनिक सिटीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याजवळ सापळा रचून शाहीद (पेडणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०५.२३ ग्रॅम गांजा आणि ३.२४ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे ६५,००० रुपये आहे.

पेडणे पोलीस स्थानकात दाखल असलेल्या जुन्या एनडीपीएस गुन्ह्यातील फरारी आरोपी दिव्यांश (३६, जम्मू आणि काश्मीर) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात ८ ऑगस्ट २०२६ रोजी मायनवाडा, कोरगाव (पेडणे) येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून आरोन आणि झकारिया या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी १२९ एलएसडी ब्लॉट पेपर्स (३.१३ ग्रॅम), ८८.५५ ग्रॅम चरस, १.०७ ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि ३.५९ ग्रॅम केटामाइन पावडर असा एकूण ७,६५,६०० रुपये किमतीचा साठा जप्त केला होता.

Goa Drug Crime
Goa Deendayal Scheme: गोवा सरकारचा मोठा निर्णय! दीनदयाळ योजनेत आता दरमहा 500 रुपये जास्त; मोटारसायकल पायलट, तृतीयपंथीयांनाही लाभ

हा साठा दिव्यांशकडून मिळाल्याचे आरोपी झकारियाने तपासादरम्यान उघड केले होते. तपासाच्या आधारे संशयित राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये फिरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आदित्य गाड, पोलीस कॉन्स्टेबल रजत गावडे आणि शांताराम महाले यांच्या विशेष पथकाने राजस्थानमधील पुष्कर येथील ''पार्क हॉटेल''मधून ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दिव्यांशला अटक केली.

तस्करीविरोधातील मोहीम तीव्र

उत्तर गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत एनडीपीएस कायद्यांतर्गत तीन नवे गुन्हे दाखल केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात हणजूण आणि पेडणे पोलीस स्थानकांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये जुन्या गुन्ह्यातील एका फरारी आरोपीसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.