

पणजी: ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभीच राज्याला कडक उन्हाच्या झळा बसत असताना आज दुपारी २.३०च्या सुमारास सत्तरीतील होंडा, केरी आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच डिचोली तालुक्यातील पर्ये, साखळीत पावसाच्या सरी बरसल्या.
अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जाणवणाऱ्या उष्म्यातून लोकांची काही काळ का होईना सुटका झाली; परंतु सत्तरी-डिचोली आणि सांगे वगळता राज्यातील इतर भागांत मात्र उष्म्याचा तडाखा कायम अधिक जाणवला.
कालपासूनच राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला असून हीच स्थिती पुढील चार-पाच दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मंदावलेला पाऊस आणि वाढलेली आर्द्रता तसेच नैऋत्येकडून वाहणारे वारे मंदावल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला आहे.
कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमान
राज्यात आज कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य तापमानाच्या तुलनेत ३.५ अंशांनी अधिक आहे. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदविले, जे सामान्य किमान तापमानाच्या तुलनेत १.९ अंश सेल्सिअसने अधिक आहे. आज राज्यात कमाल ९४ टक्के आर्द्रतेची नोंद करण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ४ टक्क्यांनी अधिक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.