Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Kokum Farming: गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आणि औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकमाच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे.
Goa Kokum Farming
Goa AgricultureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आणि औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकमाच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे. मात्र, उत्पादनात अपेक्षित सातत्य नसून वर्षानुसार चढ-उतार कायम असल्याचे कृषी संचालनालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

२०२०-२१ मध्ये राज्यात ८९ हेक्टर क्षेत्रावर ८२४ टन कोकम उत्पादन झाले होते. २०२१-२२ मध्ये लागवड क्षेत्र तेवढेच राहिले; मात्र उत्पादन घटून ७९५ टनांवर आले. २०२२-२३ मध्ये लागवड क्षेत्र ९१ हेक्टरवर पोहोचले आणि उत्पादन ८४८ टन झाले. हे गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक उत्पादन ठरले. २०२३-२४ मध्ये क्षेत्र ९६ हेक्टर झाले, मात्र उत्पादन किंचित घटून ८३० टनांवर आले. २०२५-२६ मध्ये लागवड क्षेत्र ९७ हेक्टरवर पोहोचले असून ८३५ टन उत्पादन नोंदविण्यात आले.

Goa Kokum Farming
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

कोकम लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असला तरी हवामानातील बदलांचा उत्पादनावर परिणाम होत आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान कळी येणे व फळधारणेच्या काळात थंडी आणि कडक ऊन यांचा परिणाम होतो. एप्रिल-मे महिन्यात फळे पक्व होत असताना अवकाळी पाऊस झाल्यास फळे कुजून मोठे नुकसान होते.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कोकमाच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून सध्या कोकमाला किलोमागे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे वाढत्या दराचा लाभ घेत लागवड क्षेत्राबरोबरच प्रति हेक्टर उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Goa Kokum Farming
Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com