Virat Kohli Wridhiman Saha Dainik Gomantak
क्रीडा

Cricketer Eats Ice cream with rice: 'हा' क्रिकेटपटू डाळभातासोबत खातो आईसक्रीम

विराट कोहलीने उलगडले 'या' खेळाडूचे सीक्रेट; विराटला आवडतात भुतानमधील सेंद्रिय भाज्या

गोमन्तक डिजिटल टीम

Cricketer Eats Ice cream with rice: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडुच्या खासगी जीवनातील सर्व माहिती हवी असते. आपला आवडता खेळाडू राहतो कसा?, खातो काय? याविषयी चाहत्यांना उत्सुकता असते. आता चक्क विराट कोहलीनेच संघातील एका सहकाऱ्याचे फुड सीक्रेट उघड केले आहे.

याच महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेस सुरवात होत आहे. त्यापुर्वी विराटने एका यु ट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात त्याने भारतीय विकेटकीपर वृद्धिमान साहा यांच्या आहाराच्या विचित्र सवयींविषयी माहिती दिली.

विराट म्हणाला की, जर मी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंमध्ये सर्वात विचित्र फुड कॉम्बिनेशन ट्राय करताना पाहिले असेल तर तो वृद्धिमान साहा आहे. मी एकदा त्याच्या ताटात पाहात होतो तर त्यात बटर चिकन, रोटी, सॅलड आणि एक रसगुल्ला होता. आणि त्याने दोन-तीन वेळा रोटी आणि सॅलड खाल्ले आणि संपुर्ण रसगुल्ला गिळून टाकला.

मी त्याला विचारले की, वृद्धीमान तु नेमका काय करत आहेस? त्यावर वृद्धिमान म्हणाला की, मी नेहमी अशाच पद्धतीने जेवतो. अनेकवेळा मी वृद्धिमानला डाळभातासोबत आईसक्रीम खाताना पाहिले आहे. डाळभात आणि आईसक्रीम तो एकत्र खातो. म्हणजे दोन घास डाळ भाताचे आणि एक घास आईसक्रीमचा असे.

त्यानंतर विराटने खाण्याच्या पदार्थांबाबत त्याचा आवडता आणि नावडता देश कोणता याबाबत स्वतःचा अनुभवही शेअर केला. विराट म्हणाला की, खाण्याबाबतीत भुतान येथील सेंद्रिय भाज्या खाणे हा माझ्यासाठी सर्वाधिक सुंदर अनुभव होता. तर पॅरिसमध्ये जेव्हा मी गेलो होतो तेव्हा तेथील जेवण मला फारसे आवडले नव्हते.

बऱ्याचदा खेळाडू त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वतःच्या जीवनातील अनेक क्षण शेअर करत असतात. त्यातून त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी आणि इतर जीवनशैलीही कळून येत असते. तथापि, अशी सीक्रेट मात्र त्यातून क्वचितच उघड होत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT